Friday, November 30, 2018

मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्याने सर्वत्र जल्लोष


 देऊळगाव राजा : प्रतिनिधी
      विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात कोणत्याही चर्चेविना आणि एकमताने मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक पारीत झाल्याबद्दल भाजपाच्या वतीने शहरात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
         मराठा समाजाने राज्यभरात काढलेले ऐतिहासिक ५८ मोर्चे, आंदोलने, उपोषणे, सुमारे ४० तरुणांचे बलिदान या कठोर परिश्रमांचे फळ म्हणून गुरुवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मराठा आरक्षणासंबंधीचे ऐतिहासिक विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. राज्यात सध्या लागू असलेल्या ५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाचा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (एसईबीसी) तयार करून १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाला आता शिक्षण आणि नोकºयांत आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील कृती अहवाल (एटीआर) तसेच मराठा समाजाला आरक्षण देणारे विधेयक विधानसभेत मांडले. भाजपा-शिवसेना या सत्ताधारी पक्षांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, सपा, मनसे, एमआयएम, भारिप, रिपाइं, अपक्ष अशी सर्वांनीच या विधेयकाला संमती दिल्याने एकमताने कोणत्याही चर्चेविना हे विधेयक मंजूर करण्यात आले. भाजपा सरकारने मराठा समाजाची आरक्षणाची मागण पूर्ण करुन आपले आश्वासन पूर्ण केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा सरकारचे अभिनंदन करत भाजपा कार्यकर्त्यांनी शहरात फटाक्यांची आतिष बाजी करून जल्लोष साजरा केला. भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन परिसर दणाणून सोडला होता. यावेळी नगराध्यक्षा सौ सुनिता शिंदे, डॉ. गणेश मांटे, डॉ. रामदास शिंदे, राजाभाऊ टाकळकर, सविता पाटील, निशिकांत भावसार, सुजित गुंडे, एकनाथ काकड, प्रवीण बन्सीले, धर्मराज हनुमंते, संजय तिडके, प्रवीण धनावत, सलीम पठाण, उदय छाजेड, सुधाकर जायभाये यांच्यासह इतरांची उपस्थिती होती..

No comments:

Post a Comment