यंत्रणेचे दुर्लक्ष : दारू, गुटख्याची खुलेआम विक्री; कठोर कारवाईची गरज
देऊळगाव राजा : प्रतिनिधी
देऊळगावराजा तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंद्यांना उधाण आल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरासह गावागावात खुलेआम दारू, गुटख्याची विक्री होत आहे. तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर असणाºया ठिकाणी बेकायदेशीरपणे दारूची विक्री होत आहे. मात्र पोलिसांसह सर्वच प्रशासकीय यंत्रणेचे सोयीस्कर दुर्लक्ष झाले असून, दिवसेंदिवस अवैध धंदे फोफावत असल्याचे दिसून येत आहे. मह्णून अवैध धंदे त्वरीत बंद करा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने ठाणेदार यांना करण्यात आली आहे. अवैध धंदे बंद न झाल्यास शिवसेना आक्रमक रित्या आंदोलन करणार असा इशारा देण्यात ओलला आहे.
देऊळगावराजा तालुक्यात महिना भरापासून पुन्हा एकदा बेकायदा धंदेवाल्यांनी तोंड वर काढले आहे. देऊळगावराजा शहरासह तालुकाभरात बेकायदा धंदे दिवसेंदिवस जोमाने सुरु असल्याचे चित्र आहे. त्यामुळे परिसरात चोºयांचे व शुणांचे प्रकरणात वाढ होताना दिसून येत आहे. शहरातील काही टपºयांवर खुले आमपणे दारूची विक्री होत आहे. शहरात इतर ठिकाणी असलेल्या ढाब्यांवरदेखील खुलेआमपणे बेकायदा दारूची विक्री होत आहे. काही गावात बेकायदा दारूविक्रेत्यांनीही देऊळगावराजा शहरात चांगलेच बस्तान बसवल्याचेही चित्र आहे. बेकायदा दारू विक्रीबरोबरच तालुक्यात गुटखा, बेकायदेशीरपणे विक्री होत आहे. त्यामुळे दि.२९ नोव्हेंबर रोजी शिवसेनेच्या वतीने अवैध धंदे त्वरीत बंद करा असे निवेदन ठाणेदार सारंग नवलकार यांना देण्यात आले आहे. तसेच निवेदनात आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा ही देण्यात आलेला आहे. या निवेदनात जिल्हा उपप्रमुख दिपक बोरकर, तालुका प्रमुख दादाराव खार्डे, शहरप्रमुख मोरेश्वर मिनासे, माजी नगराध्यक्ष गोविंद झोरे, गोपाल व्यास, रंजित काकड, अविनाश डोईफोडे, रवि झोरे, अनिल चित्ते, गिरीष वाघमारे, अभय दिडहाते, अतिष खराट, राजेश सपाटे, विजयदेव उपाध्ये, मोति सुनगत, सचिन वाघमारे, संदिप कटारे, शिवाजी कुहिरे, दिपक पवार, मोहन खांडेभराड आदी शिवसैनिकांच्या स्वक्षºया आहेत.




No comments:
Post a Comment