आरोपी फरार, नकली नोटा चालविणारे रॅकेट सक्रिय
देऊळगाव राजा - (प्रतिनधी)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा नष्ट करुन चलनात असलेल्या नकली नोटा व्यवहारातून बाद करण्यासाठी नोटा बदलल्या असल्यातरी अजूनही नकली नोटा बनविणारे व ते चालविणारे रॅकेट हिंदुस्थानात सक्रीय आहे. हे देऊळगावराजा येथे पकडलेल्या नकली नोटावरुन आढळून आल्याने पोलिसांनी तक्रारीवरुन गुन्हे दाखल केले असून आरोपी फरार आहे. नकली नोटा चालविणारे रॅकेट देऊळगावराजा व परिसरात असावे असा संशय पोलिसांना असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. तसेच आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पोलीस उपनिरिक्षक नीता गायकवाड यांच्या नेतृत्वात एक पथक स्थापन केले आहे.
याबात सविस्तर माहिती अशी की, सिंदखेडराजा येथील एलआयसी एजंट एस. एस. सुतार हा देऊळगावराजा एलआयसी कार्यालयात पॉलिसीचा भरणा करण्यासाठी गेला होता. त्याने पॉलिसीच्या रकमेचा भरणा केला. त्यादिवशी देऊळगावराजा आठवडी बाजार होता. एलआयसी ऑफीसमध्ये प्रचंड गर्दी होती. त्यानंतर एलआयसीच्या कॅशियरने सदर रक्कम महाराष्ट्र बँकेत भरणा करताना महाराष्ट्र बँकेच्या कॅशियरच्या लक्षात आले की, १०० रुपयांच्या ५३ नोटा नकली आहे. त्याने लगेच एलआयसीच्या कॅशियरला परत दिल्या. यावरुन एलआयसी व महाराष्ट्र बँकेच्या कॅशियर या दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. त्यानंतर एलआयसीचे देऊळगावराजाचे शाखा व्यवस्थापक अनिरुद्ध सुरेश घोंगडे यांनी देऊळगावराजा पोलिसात नकली नोटा प्राप्त झाल्याबाबत तक्रार नोंदविली. त्यानंतर देऊळगावराजा पोलिसांनी सीसीटीव्हीचे संपूर्ण फुटेज तपासले असता सदर नोटा सिंदखेडराजा येथील एस.एस. सुतार या एलआयसी एजंटने एलआयसी ऑफीसमध्ये भरणा केल्याचे निदर्शनास आले. लगेच पोलिसांनी सदर आरोपीच्या शोधात सिंदखेडराजा गाठले असता सदर आरोपी फरार झाल्याचे समजले. देऊळगावराजाचे ठाणेदार सारंग नवलकर यांनी लगेच पीएसआय नीता गायकवाड व रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात एक पथक स्थापन करुन आरोपीचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे देऊळगावराजा व परिसरात नकली नोटा चालविणारे रॅकेट सक्रीय असावे असा पोलिसांचा कयास असून त्या दृष्टीने पोलीस यंत्रणा तपास करीत आहे.

No comments:
Post a Comment