देऊळगाव राजा : प्रतिनिधी
जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारताने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाचा स्वीकार केला होता. तर २६ जानेवारी १९५० पासून संविधान लागू करण्यात आले होते. संविधानाबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी देशभरातील शाळांमध्ये संविधान दिवस साजरा केला जातो. याच गोष्टीचा अवलंब साधून फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन नेहमी सामाजिक सलोखा ठेवून आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर भूमिका असणाºया संकल्प फाउंडेशनच्या वतीने दि.२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून नगर पालिका प्रथामिक शाळेला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा भेट देवून साजरा करण्यात आला.
स्थानिक न.प.म.प्रा.शाळा क्र. २ मध्ये संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली. तसेच सर्व शिक्षक शिक्षिका वृंद व विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे प्रास्ताविका प्रत भेट देऊन संविधानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली यावेळी उपस्थित समस्त मान्यवरांनी संविधानाचा सन्मान करण्याचे आवाहन केले. यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी न.प.उपाध्यक्ष पवन झोरे, शांतू भाग्यवंत, प्रसन्न जोशी, अरविंद खांडेभराड, राजेश सपाटे यांबरोबरच शाळेचे मुख्याध्यापक नायकडा सर, मघाडे सर, डिघोळे सर, नागरे सर, राठोड सर, वाघ मॅडम यांची प्रामुख्याने उपस्थिति होती.यावेळी संकल्पचे योगेश खरात,दिपक म्हस्के,सागर भाग्यवंत,सचिन खरात आदिसह संकल्प फाउंडेशनचे सर्व सदस्य हजर होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी योगेश खरात यांनी पुढाकार घेतला तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर भाग्यवंत यांनी केले तर आभार अरविंद खांडेभराड यांनी मानले.


No comments:
Post a Comment