Friday, November 30, 2018

दुष्काळी भागावर २९३ अन्वये चर्चा करत असताना आमदार डॉ.शशिकांत खेडेकर


 देऊळगाव राजा : प्रतिनिधी       
          सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ हा मराठवाड्याला लागून आहे. मराठवाड्यामध्ये सततची दुष्काळी परिस्थिती आहे,तशीच परिस्थिती माज्या सिंदखेडराजा मतदारसंघात आहे.गेल्या तीन ते चार वर्षांपासून सतत हा मतदारसंघ दुष्काळाशी सामना करीत आहे यावर्षी तर अल्पशा पावसामुळे मागील पाच पंचवीस वर्षात निर्माण झाली नसेल एवढी भीषण पाणी टंचाई या मतदारसंघांमध्ये निर्माण झाली आहे.पाणीटंचाईमुळे लोकांना गाव सोडावे लागेल एवढी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.जनावरांना पिण्याचे पाणी नाही,चारा नाही त्यामुळे जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात चारा छावण्या उभारण्याची गरज आहे.मागेल त्या गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज आहे. 
    खडकपूर्णा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प माज्या मतदारसंघामध्ये आहे. ६७ दशलक्ष पाण्याचा मृतसाठा या धरणामध्ये आहे.त्यामुळे आज रोजी केवळ २४ द.ल.घ.मी. मृतसाठा मध्ये पाणी शिल्लक आहे.एवढी गंभीर स्थिती या मतदारसंघामध्ये पूर्वी कधीही निर्माण झाली नाही.अल्पशा पावसामुळे खरिपाची पिके सोयाबीन कापूस ही पिके हातची गेली आहेत. शेतकºयांच्या संपूर्ण खरीप हंगाम उध्वस्त झाला आहे.रब्बीची पिके सुद्धा शेतकºयांना घेता आली नाहीत त्यामुळे कधी नव्हे एवढा आमच्या शेतकरी अडचणीत आला आहे, हतबल झाला आहे. त्याला आधार देण्याची गरज आहे. अशी भयानक परिस्थिती या मतदारसंघांमध्ये आहे.सिंदखेडराजा मतदारसंघातील जो दुष्काळी भाग म्हणून जाहीर झाला त्यामध्ये दुदैर्वाने अति दुष्काळ असतांनाही देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगाव मही महसूल विभाग तसेच चिखली तालुक्यातील  मेरा बुद्रुक महसूल विभाग व त्यातील गावे दुष्काळग्रस्त जाहीर झाली नाहीत, हे अत्यंत दुदैर्वी आहे.आश्चयार्ची बाब मला निदर्शनास आणून द्यायची आहे की या महसूल विभागाची अंतिम पिके आणेवारी सुद्धा ४६-४७ पैसे आलेली आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगाव मही व चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक महसूल मंडळ व त्यातील गावे शासनाने दुष्काळग्रस्त घोषित करावीत. ही परिस्थिती केवळ सिंदखेडराजा  मतदारसंघांमध्ये निर्माण झाली नाही तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये अशीच परिस्थिती आहे त्यामुळे मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की संपूर्ण बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा कायमस्वरूपी दुष्काळ ग्रस्त असलेला हा माँसाहेब जिजाऊंचा मतदारसंघ भविष्यात सुजलाम सुफलाम करायचा असेल तर महत्त्वकांक्षी असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाची मेरा बुद्रुक व इतर भागातील अपूर्ण असलेली कालव्याची कामे पूर्णत्वास नेली तर त्या भागातील शेतकºयांना त्याचा लाभ होईल. सिंदखेडराजा मतदारसंघातील आमना, पाताळगंगा व भोगावती या ३ प्रमुख नद्या आहेत त्याचे खोलीकरण करून, त्यावर सिमेंट बंधारे उभारले गेले तर हा मतदारसंघ सुजलाम सुफलाम होईल म्हणून या नदीचे खोलीकरण आणि त्यावर प्रस्तावित असणारे द्वारयुक्त सिमेंट बंधारे बांधण्यासाठी जलसंधारण महामंडळाकडून त्याला प्रशासकीय मान्यता देऊन त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.या शिवाय आणखी काही छोट्या छोट्या नद्या या भागात आहेत त्या नदीचे खोलीकरण आणि पुनरूज्जीवन करण्याच्या माध्यमातून त्यावर बंधारे उभारले तर या मतदारसंघाला त्याचा फार मोठा फायदा होईल. खडकपूर्णा  प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात बाहेर होणाºया पाण्याची चोरी थांबवण्यात यावी.खडकपूर्णा प्रकल्पावर उपसा सिंचन योजना आहेत उपसा सिंचन योजना वर सौरऊर्जा पंप बसवले तर भविष्यात शेतकºयांना याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत आराखड्यामध्ये पाणीपुरवठा योजना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून द्यावा माननीय मंत्री नामदार बबनराव लोणीकर साहेब यांनी या मतदारसंघाला झुकते माप दिले आहे.त्यांनी मतदार संघातील आराखड्याबाबत अतिशय चांगल्या प्रकारे निधी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी कायमस्वरूपी दुष्काळ असलेल्या मतदारसंघाला आपण जास्तीत जास्त प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून घ्यावा. खडकपूर्णा प्रकल्प नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्याची कोणतीही तरतूद नाही या नदीपात्राच्या काठावर जवळपास 44 गावांच्या योजना आहेत नदीच्या पात्रात पाणी सोडण्याची कोणतीच तरतूद नसल्याने या गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. माननीय मंत्री महोदयांना माझी अशी विनंती आहे की या ४४ गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी खडकपूर्णा धरणावरून एक विशेष एक योजना कार्यान्वित करावी. 
           देऊळगावराजा शहरात भिषण पाणी टंचाई
          देऊळगाव राजा शहराची ४० हजार लोकसंख्या असलेल्या शहरात योजनेअंतर्गत १४ कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती पुढे ही योजना बंद झाली यामुळे दोन ते २.५ कोटी रुपयांची कामे अपूर्ण राहिली यासाठी माननीय मंत्री यांनी वारंवार संबंधित अधिकाºयांसोबत बैठक घेतल्यामुळे सुधारित प्रशासकीय मान्यता जरूर मिळाली परंतु अजूनही त्यासाठी निधी उपलब्ध झालेला नाही त्यामुळे ४० हजार लोकसंख्या असलेल्या देऊळगाव राजा या शहराला आजही भीषण पाणी टंचाई तोंड द्यावे लागत आहे म्हणून आपण जर हा अल्पसा निधी प्राप्त करून घ्यावा अशी माहिती स्वीय साहाय्यक संतोष सुदाम शिंगणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

1 comment:

  1. Well done Ashraf bhai ��������

    ReplyDelete