निमित्त ऊर्जा परिवाराचे वतीने आयोजित मातृ पितृ वंदनाचे कार्यक्रम
देऊळगाव राजा : प्रतिनिधी
श्री बालाजी महाराजांचे पावन भूमीत इतिहासात नोंद होईल असा अनोखा मातृ-पितृ वंदन म्हणजेच कर्ज आणि फर्ज अदा करणे चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी उपस्थित धर्म सभेला संबोधित करतांना प.पू. महामनाचार्य कुशाग्रनंदीजी गुरुदेव यांनी सांगितले की आपल्या जीवनात प्रथम स्थान माता का दुसरा पिता का और तिसरा गुरुका होना चाहीये.पाश्चिमात्य संस्कृती मुळे अनेक पाल्य आपल्या जन्म दात्या माता पित्यांना विसरून चालले आहे ही विदारक परिस्थिती बदलणे काळाची गरज असल्यामुळे या भूमीत हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
यावेळी मंचकावर मुनिश्री अजय ऋषीजी महाराज,अरिहंत ऋषीजी भट्टरक स्वामीजी (एनर्जी गुरू) भाजपाचे प्रदेश प्रवक्ता माधव भंडारी, ह.भ.प.फुरसुंगीकर महाराज,खा. प्रतापराव जाधव,आ. डॉ. शशिकांत खेडेकर, नगराध्यक्षा सौ.सुनिता शिंदे, आशिष देव, उपस्थित होते. याबाबत सविस्तर असे की ऊर्जा परिवार व सकल जैन समाजाचे वतीने दि. २७ नोव्हेंबर रोजी धुंडिराज महाराज मठात २७ माता पित्यांचे त्यांच्या पाल्याकडून वंदनाचा व पूजनाचा सोबतच कर्ज व फर्ज अदा करण्याचा अनोखा कार्यक्रम असयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तर उमरगा येथील राजेंद्र जैन यांनी अफलातून कत्तक सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली. हजारोच्या संख्येने उपस्थित जनसमुदायला मार्गदर्शन करताना गुरुदेवांनी सांगितले की ज्याची जेवढी आवश्यकता आहे त्याने त्याचे जीवनात तेवढाच आनंद घेतला पाहिजे,मातृ वंदना म्हणजे माता ला सर्वत्र पुज्यतेचे स्थान आहे तुम्हाला तिने जन्म दिला म्हणून तुम्ही या पृथ्वीवर आहात तिने तुम्हाला जन्म नसता दिला तर तुमचं जीवन केव्हाच समाप्त झाले असते,आपल्या जीवनात प्रथम स्थान मातांचे, दुसरे पित्यांचे, व तिसरे गुरुचे असणे आवश्यक आहे,पाश्चिमात्य संस्कृतीमुळे पाल्य आपल्या माता पित्यांना विसरत चालले आहे,माझे वडिलांनी मला १३ व्या वर्षात दीक्षा दिली ,आपल्या संस्कृती मय भारत देशात भारत को माता,गौ को माता,तथा जन्म देणारी माता असे संबोधले जाते, व्यक्ती कितीही मोठा झाला तरी त्याने माता पित्यासमोर झुकलेच पाहिजे मोदी पंतप्रधान झाल्या नंतर प्रथम आईचे दर्शन घेण्यासाठी गावी गेले, अनाथ मुलांचा आदर करणे शिखा, त्यांना आपल्या माता पित्यांची आठवण येणार नाही असे कार्य करा, याच धर्मसभेला संबोधित करतांना एनर्जी गुरू स्वामी भट्टारक यांनी सांगितले कि उपदेश सबको सूनना है उपाय नही उपर जिसका अंत नही जिसे आसमा कहते है, धरती पर जीसका अंत नही ऊसे माँ कहते हैं, मातृ पितृ भक्त कर्ज और फर्ज शब्द का जुडाव यह भारत की भूमी है यहापर एक दिन नही बलकि हमेशा के लिये माता पिता की याद रखना चाहीये, हम सबको श्रवण बाळ बनना चाहीये और अपना फर्ज अदा करणा चाहीये, माँ तू सागर, चांद सुरज से भी बडी है, माँ सिर्फ जीवन की पहली पाठशाळा है, पिता का प्यार दीखता नही, पिता डायरेक्टर का रोल अदा करता है,या अनोख्या कार्यक्रमात २७ जैन ,अजैन माता पित्यांचे त्यांच्या पाल्याकडून विधिवत मंत्रोच्चार करून पाद प्रक्षालन व पूजन करण्यात आले, ५ तास चाललेल्या या कार्यक्रमाचे सूत्र संचालन ऊर्जा परिवाराचे मनिष कोठेकर व नेहा जैन बेंगलोर यांनी केले.

No comments:
Post a Comment