दि.०२ डिसेंबर रोजी देऊळगावराजा येथे सायकलोथॉन स्पर्धा
सांगलीच्या सायकल स्पर्धकांनी मारली बाजी, महिला गटात अमरावतीच्या महिलानी ३ पुरस्कार पटकवला
देऊळगाव राजा : प्रतिनिधी
दैनंदिन जीवनात आपल्या सुरक्षिततेबद्दल विचार केला की डोळ्यासमोर वर्तमानपत्रातील रोजच्या अपघाताच्या बातम्या येतात. त्यामुळे आपले मन सुन्न होते. त्यातूनच रस्त्यावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. ही सर्वांसाठी चिंतेची बाब असून शासनही समाज प्रबोधनासाठी विविध उपक्रम राबवत असते. असे स्पर्धेत भाग घेवून वाहतूक नियम आणि आरोग्याची काळजी घ्या. असे प्रतिपादन सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी दि. ०२ डिसेंबर रोजी परम सायकलोथॉन स्पर्धेत केले आहे.
सायकलोथॉन स्पर्धेच्या अध्यक्ष स्थानी नगराध्यक्षा सौ.सुनिता शिंदे हे होत्या तर स्पर्धेचे उद्घाटक म्हणून सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर उपस्थित होते. सकाळी ७ वाजून कुंभारी परिसरातून या स्पर्धेस प्रारंभ झाला. गजानन महाराज मंदिर पासून ते स्वरुचि हॉटेल आणि परतीच्या प्रवासाने गजानन महाराज मंदिर येथून येऊन या स्पधेर्चा समारोप करण्यात आला. पुढे बोलतांना आ.डॉ.खेडेकर म्हणाले की, वाहतूक नियमांचे पालन करण्यात यावे, नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, प्रदूषण, या उद्देशाने आयोजित केलेल्या परम सायकलोथॉन स्थानिक परम क्लासेसेचे संचालक जयवंत देशमुख यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन समाजामध्ये वाहतुकीच्या नियमाबाबत तथा आरोग्याबाबत तसेच इंधन बाबात जाणीव जागृती घडवून आणली त्यासाठी त्यांचे अभिनंदन. दि.२ डिसेंबर रोजी परम क्लासेस आणि जान्हवी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१ कि. मी. अंतराच्या सायकल स्पर्धेत सांगलीच्या प्रकाश आळेकर याने रेसिंग प्रकारात प्रथम २१०००, द्वितिय पुरस्कार ११००० सांगलीच्याच दिलीप माने, तृतिय पुरस्कार ९००० सांगलीचे सोहल रियाज, चौथे पुरस्कार ७००० सांगलीचे किरण बंडगर, पाचवे पुरस्कार ५००० अमरावतीचे जल्मोजय मुगल यांनी बाजी मारली. तसेच मुलीच्या गटात प्रथम पुरस्कार ५०००, सृष्टी शिवणकर, द्वितिय पुरस्कार ३००० मुक्ती ढोरे, तृतिय पुरस्कार २००० प्रांजली श्रीनाथ अमरवतीच्या स्पर्धकांनी यश संपादन केले. या स्पर्धेत ३०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्याच सोबत जेष्ठ नागरिकांनीही आपला सहभाग नोंदवून आपल्या आरोग्यशी न्याय केला. याप्रसंगी न.प.उपाध्यक्ष पवन झोरे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर जाधव, नगरसेवक नंदन खेडेकर, राजेंद्र चित्ते, माजी नगराध्यक्षा सौ.मालती कायंदे, मातृतिर्थ तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षा सुषमा राऊत, काँग्रेस नेते रमेश कायंदे, मारेश्वर मिनासे, वसंत अप्पा खुळे, प्रा.डॉ.गजानन जाधव, डॉ.गणेश मांटे, दशरथ राठोड, डॉ.रामदास शिंदे, गजेंद्र देशमुख, गणवंत देशमुख, वैभव देशमुख, यशवंत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे आभार प्रल्हाद देशमुख यांनी मानले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील कानाकोपºयातील स्पर्धकानी सहभाग घेतला. स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी परम क्लासेसेचे संचालक जयवंत देशमुख तसेच पोलिस कर्मचारी, पत्रकार यांनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment