व्यंकटेश महाविद्यालयात महिला सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन
देऊळगाव राजा : (प्रतिनिधी)
'मी टू' मोहिमेमुळे महिलांवरील अन्याय दूर होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच स्त्रीयांनी दुसºयाच्या ओंजळीने पाणी न पिता स्वत: निर्णय घ्यायला शिकावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या प्रा. मंगला खिवंसरा यांनी केले.
महिला सक्षमीकरण कार्यशाळेप्रसंगी प्रमुख अथिती म्हणून त्या बोलत होत्या. उद्घाटन नगराध्यक्षा सुनीता शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. देशाला लाभलेल्या कर्तबगार महिलांच्या कायार्ची माहिती देताना प्रा. मंगला खिवसरा म्हणाल्या, कुपोषण, निरक्षरता, स्वातंत्र्याचा व संधीचा अभाव महिला सक्षमीकरणातील प्रमुख अडथळे आहेत. ते स्त्रीयांनी स्वत:च्या हिंमतीवर दूर करावेत. 'मी टू'सारख्या चळवळी अलिकडच्या काळात सुरू झाल्यात. या माध्यमातून स्त्रीयांवरील अन्याय, अत्याचाराला पायबंद बसेल. महिला सक्षमीकरणासाठी शासनस्तरावर केल्या जाणाºया प्रयत्नांना सर्वांनी प्रतिसाद देणे अपेक्षित असल्याचे सुनीता शिंदे म्हणाल्या. प्राचार्य गजानन जाधव यांनी पुरुषांनी महिलांना दुषणं दिल्यापेक्षा परस्पर समन्वयातून महिला सक्षमीकरणाचा लढा उभारावा, असे आवाहन केले. देशातील जुनाट प्रथा परंपरा स्त्री-पुरूष समानतेला मारक असून या कुप्रथांचे समूळ उच्चाटन व्हावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अॅड. कल्पना त्रिभूवन यांनी महिला सक्षमीकरणासंदर्भात असलेल्या कायद्याविषयी माहिती दिली. प्रास्ताविक डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी तर सूत्रसंचालन मधुकर जाधव यांनी केले. आभार प्रा. एन.पी. काकडे यांनी मानले.


No comments:
Post a Comment