Sunday, December 2, 2018

मुस्लिम समाज कब्रस्तान मधील विद्युत खांब तात्काळ उभारा


युवा हिंद सेनेच्या वतीने वितरण कंपनीला निवेदन
देऊळगावमही : (गजानन चोपडे) 
       येथील मुस्लिम कब्रस्तान मध्ये विद्युत खांब उभारून दिवाबत्तीची सोय करा अन्यथा वितरण कंपनी विरुद्ध आंदोलन छेडू असा इशारा युवा हिंद सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. दि.१ डिसेंबर रोजी वीज वितरण विभाग अभियंता चिथोडे यांना निवेदन देण्यात आले.
     सदर निवेदनात नमूद केले आहे की देऊळगाव मही येथील मुस्लीम कब्रस्तान मधील असलेले विद्युत खांब अनेक महिन्यांन पासून पूर्णपणे खाली पडलेले असून त्याच बरोबर खांबाला असलेले विद्युत तार ही जमिनीवर लोंबकळलेल्या आहेत परिणामी अनावधानाने मोठी घटना घडून जीवित हानी होण्याची शक्यता आहे. 
तरी खूप दिवसा पासून पडलेले हे अपुरे काम आपण जातीने लक्ष देऊन येत्या ८ दिवसात कब्रस्तान परिसरातील पडलेली खांब व लोम्बकळलेली विद्युत तारे काम पूर्ण करावे अन्यथा लोकशाही मागार्ने आंदोलन करण्यात येईल आता इशारा ही देण्यात आला. या वेळी युवा हिंद सेने चे आदील एच पठाण, शेख कलिम,सैयद सईद, रहीम पठाण, शेख शकील, शेख सोहिल, शेख करीम, शे.अमान यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

No comments:

Post a Comment