Sunday, December 2, 2018

सिदखेडराजा नाफेड खरेदी केंद्रावरील तुर - चना घोटाळ्याची होणार चौकशी


  आ.डॉ.खेडेकर यांची सभागृहात मागणी!  
 देऊळगाव राजा : (प्रतिनिधी) 
     सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील सिंदखेडराजा येथे नाफेडने सन २०१७ - १८ अंतर्गत सिंदखेडराजा खरेदी विक्री संघामार्फत तूर व हरभरा खरेदी केला. हरभरा व तुर खरेदी करत असतांना एखाद्या शेतकºयाने १० क्विंटल हरभरा दिला असेल तर त्या शेतकºयाचे  खात्यात केवळ ७ क्विंटलचेच पैसे जमा झाले. ज्या शेतकºयांने १२ क्विटंल तुर मोजून दिली असेल  त्या शेतकºयांच्या खात्यात १० क्विटंल चेच पैसे जमा झाले. अशा प्रकारे या नाफेड खरेदी केंद्रावर शेतकºयांची फार मोठ्या प्रमाणात लूट झाली संबंधित कर्मचारी व व्यापाºयांनी ही लूट या ठिकाणी केलेली आहे. जवळपास १०३५ क्विंटल हरभरा व २००  क्विंटल तुर गायब झालेली आहे. म्हणून माझी शासनास विनंती आहे याप्रकरणी राज्यस्तरीय चौकशी झाली पाहिजे व दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. शेतकºयांना त्यांचा राहिलेला मोबदला देऊन शेतकºयांना न्याय द्यावा. अशी आग्रही मागणी या वेळी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी सभागृहात केली. 

No comments:

Post a Comment