देऊळगाव मही : (प्रतिनिधी).
बालकांच्या रोगप्रतिकारशक्ती व एकाग्रतेवर आघात करणाऱ्या एमआर या गोवर-रूबेला प्रतिबंधक लसीचा लाभ तालुक्यातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ३२ हजार ७६२ बालकांना मिळवून देण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. लसीकरण बाबतदिवसेंदिवस समाजात वेगवेगळ्या अफवा पसरवली जात असून या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पं.स. सभापती कल्याणी शिंगणे यांनी केले.
देऊळगाव मही येथे बालकांचे रक्षण करणाऱ्या लसीकरण मोहीमेचा नुकताच प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच सविता शिंगणे, राजेंद्र चित्ते, गजेंद्र शिंगणे, भगवान इंगळे, सुनील मतकर, राजेंद्र शिंगणे, विजय राऊत, संगीता मोरे, विष्णू टेकाळे, मुख्याध्यापक जायभाये, नागरे, संगीता चेके, अरुणा गवई यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. पुढे बोलतांना शिंगणे यांनी सांगीतले की, ३९८ सत्रामध्ये सर्व शाळांमध्ये ही मोहीम राबविली जाणार असून शाळाबाह्य मुलेही यापासून वंचित राहू नये, यासाठी शाळा बाह्य ठिकाणीही गोवर आणि रूबेला लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे. मेंढपाळ, ऊसतोड, झोपडपट्टी, रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणीही लसीकरणासाठी ६ फिरती पथके तैनात रहाणार आहेत. त्यामुळे मनात भीती न बाळगता सर्वांनी या मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले..


No comments:
Post a Comment