Tuesday, December 4, 2018

जगण्याचा दृष्टिकोन मोठा ठेवा : बाजड


देऊळगाव मही : (प्रतिनिधी).
       निसर्ग कधी कधी कुणावर अन्याय करतो. एखाद्याला धडधाकट शरीर देतो तर दुसऱ्याला अपंगत्व. मात्र जगण्याचा दृष्टिकोन मोठा असला तर कसलाही अडथळा आड येऊ शकत नाही. उलट निसर्गालाच आव्हान देण्याची ताकत उभी केली जाऊ शकते, असे प्रतिपादन तहसीलदार दीपक बाजड यांनी केले. .
        देऊळगाव मही अपंग मूकबधिर विद्यालयात पार पडलेल्या अपंग मतदान नोंदणी कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनील आरमाळ तर प्रमुख उपस्थितीत नायब तहसिलदार मदन जाधव, पवार, जवंजाळ, सरपंच सुभाष शिंगणे, शाळेचे मुख्याध्यापक झनक, कुलकर्णी, सुनील मतकर, विजय राऊत, अर्जुन सोनसळे, कविता खरात, अंबादास बुरकुल, विनोद सुल्ताने, शिवाजी माटे हे होते. पुढे बोलतांना तहसीलदार बाजड म्हणाले की, देशात अनेक लोकांनी दिव्यांग असताना परिस्थितीपुढे हार न मानता आपल्या अंगात असणाऱ्या कला गुणांनी आपली ओळख निर्माण केली. आपल्या माध्यमातून देखील हे कार्य होऊ शकते. यावेळी अपंग मतदारांचा गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले..

No comments:

Post a Comment