Friday, December 14, 2018

गांगलगाव येथे अवैध दारु विक्रीचा महापुर


अवैध दारुबंदीसाठी गांगलगाव येथील महिला व पुरुष मोर्चा धडकला अंढेरा पोलीस स्टेशनवर 
अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करा भारीप बहुजन महासंघ व एम्.आय एम्.ने दिला आंदोलनाचा इशारा.
अंढेरा : (ज्ञानेश्वर म्हस्के)
         अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे ग्राम गांगलगाव येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्रीचा महापुर सुरु असुन गावातील ५ते ६महिला ह्या गावात अवैध रित्या दारु विक्री करत असुन अंढेरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार व बीट जमदार कोणत्याच प्रकारची कार्यवाही करताना दिसत नाही.
    आज दि.१४डिंसेबर २०१८ रोजी गांगलगाव येथील महिला शक्ती गावातील पुरुषांसह मोठ्या संख्येने गावातील दारुबंदी पोलीसांनी तात्काळ बंद करावी यासाठी गाठले पोलीस स्टेशन ठाणेदार यांच्या कँबीनमध्ये मांडला महिलांनी ठिय्या.गावात अवैध दारुमुळे रोज भांडणे होत असुन हजारो संसार उदवस्त झाले आहेत.लहान मुले सुध्दा व्यसनाच्या आहरी जात असुन ज्या पोलीस खात्याला ही जबाबदारी दिली आहे.ते कुठलीच कार्यवाही करत नसुन गांगलगाव गावातील अवैध दारु विक्री करणारे दादागिरीची भाषा करत असुन आम्ही पौलीसांना हप्ते देतो असे ठणकाऊन  सांगतात. गावातील सामान्य महिला या प्रकाराला कंटाळल्या असुन या सर्व प्रकाराला पोलीसच कारणीभुत असुन जो पर्यत गावातील अवैध दारु पोलीस प्रशासन कायमची बंद करणार नाही तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहील अशा शब्दात महिलांनी ठाणेदाराला सुनावले गांगलगाव गावात चक्क दिवसाढवळ्या किराणा दुकाणात दारु मिळते.या दारु विक्री करणाऱ्या विरोधात आवाज उठावल्यास दारु विक्री करणाऱ्या महिला आमची छेडखाणी केली असा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याने गांगलगाव वाशी ञस्त आहेत.गेल्या हप्त्यात गावातील अवैध दारु विक्री बाबत बोलणारे सुभाष भास्कर म्हस्के वय ३२वर्षे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला.अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी लोटले पोलासांचे काम महिलावर तुम्ही रंगेहात दारु पकडा आम्ही कार्यवाही करतो असे म्हणाले. यावेळी सदरच्या निवेदनावर भारिप शाखा अध्यक्ष गांगलगाव मंदाबाई वाकोडे, छाया निंबोने, पुजा निंबोने, प्रिती आराख, वनिता आराख, उर्मिला म्हस्के, शोभा म्हस्के, शोभा आराख, मंदाबाई आराख, अलका शेळके, निर्मला म्हस्के, रमाबाई जाधव,कमल म्हस्के, आशामती मिसाळ, सुमन हिवाळे,गोदावरी सिंगारे,शोभा पवार, अनिता आराख, दसमाबाई निंबोने, यासह भारिप तालुका अध्यक्ष धर्मराज खिल्लारे,भारिप यु.ता अध्यक्ष विशाल आराख, भारिप शहराध्यक्ष अमोल खिल्लारे, मनिष अंभोरे, अक्षय हिवाळे आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment