बालकांच्या रोगप्रतिकारशक्ती व एकाग्रतेवर आघात करणाऱ्या एमआर या गोवर- रूबेला प्रतिबंधक ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना देण्याचा केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाचा मानस आहे.आज सकाळपासून देऊळळगाव राजा हायस्कूलमधील वर्ग ५ ते ९ मधील एकूण ३०४५ बालकांपैकी २९०७ बालकांना (९५.४६℅) गोवर- रूबेला प्रतिबंधक लस देण्यात आली
यावेळी देऊळगावराजा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ आसमा अब्दुल हमीद,तालुका वैद्यकीय अधिकारी दत्ता मांटे ,डॉ सुभाष शिंगणे ,डॉ राहुल सोनूणे, डॉ प्रवीण ससाने, डॉ कु शुभदा जाधव आरोग्य विभागातील आशा व आरोग्य सेविका कर्मचारी, देऊळगावराजा हायस्कुलचे मुख्याध्यापक महादेव थोरवे पर्यवेक्षक डी. ए. खांडेभराड, आर. बी.कोल्हे शिक्षक जनार्धन मेहेत्रे, विजय दीडहाते, भगवान कायंदे,रामदास गुरव आदिंसह शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद याबरोबरच पालक उपस्थित होते.यावेळी आ डॉ शशिकांत खेडेकर,सचिव सुबोधजी मिश्रिकोटकर यांनी भेट दिली. शाळेत झालेल्या लसीकरणा बरोबर शाळाबाह्य ठिकाणीही लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून यामध्ये मेंढपाळ, ऊसतोड कामगार ,झोपडपट्टी व विविध ठिकाणी कामासाठी वास्तव्य करणाऱ्या वस्तीतील बालकांसाठीही आरोग्य विभाग गोवर रूबेला लसीकरण मोहीम राबवीत आहे.


No comments:
Post a Comment