अवघ्या काही दिवसावर लोकसभा विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या असतांनाच राजकीय उलथापालथ सर्वच राजकीय पक्षाची बघायला मिळत आहे राजकीय पंढरी म्हणून ओळख असलेल्या देऊळगावमही नगरीचे माजी तंटामुक्ती तसेच अध्यक्ष शिवहरी शेषराव शिंगणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ला सोडचिठ्ठी देत सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुबंई येथे शिवसेनेत प्रवेश घेतला आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी आरोग्य मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळख . शिवहरी शिंगणे यांच्या पत्नी सौ.अस्मीता शिवहरी शिंगणे यांच्यावर डॉ राजेंद्र शिंगणे यांनी देऊळगावमही नगरी सरपंच पदाची जबाबदारी दिली मात्र काही महिन्यातच ग्रामपंचायत सदस्य तसेच राष्ट्रवादी कार्यकर्ते यांनी अस्मीता शिवहरी शिंगणे यांच्यावर विविध आरोप करून अविश्वास आणुन त्याना सरपंच पदाऊन पाय उतार व्हावे लागले मात्र डॉ राजेंद्र शिंगणे यांनी अस्मीता शिवहरी शिंगणे यांच्यावर केलेल्या विविध आरोपाची शहानिषा न करता केवळ ग्रामपंचायत सदस्य तसेच कार्यकर्ते यांच्या सांगण्यावरून त्यांना पायउतार व्हावे लागले या प्रकरणात शिवहरी शिंगणे यांच्या कुटूंबाला विविध मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले मात्र नाराज असेलेले शिवहरी शिंगणे यांनी मालिक दिलदार है मगर चमचोसे परेशान है !असे म्हणत शिवसेनेत जाहीर प्रवेश घेऊन नव्या राजीकीय प्रवासाला सुरुवात केली आहे मात्र एका निर्भीड आणि स्वच्छ प्रतिमेच्या सच्या कार्यकर्त्याला विविध आरोप करून स्वतःला स्थानिक नेते समजणाऱ्या लोकांनी त्यांना डॉ शिंगणे पासुन करण्याचा अराजकीय प्रयन्न केला परंतु त्यांच्या शिवसेनेच्या प्रवेशामुळे शिवसैनिकामध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे तसेच राष्ट्रवादी नाराज असलेले किती कार्यकर्ते डॉ शशिकांत खेडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गळाला लागततात हे पाहणे औचित्त्याचे ठरणार आहे या वेळी सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ शशीकांत खेडेकर , जिल्हा प्रमुख जालीधर बुधवत ,गुलाबराव शिंगणे , स्वप्नील शहाणे, संदीप राऊत आदी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment