देऊळगाव मही :- (प्रतिनिधी)
देऊळगाव मही येथील राजकीय नेते मनोरंजन हॉटेल चे मालक राजेंद्र शिंगणे यांचे पुत्र स्व.सोनू शिंगणे यांच्या पुण्य स्मरण दिनी संत ज्ञानेश्वर निवासी मुकबधीर विद्यालय देऊळगाव मही येथे लहान मुलाना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले.
सोनू शिंगणे हे स्वतः च्या हॉटेल वरून घरी परतत असताना टू व्हीलर वरती त्यांचे ८ डिसें २०१७ रोजी अपघाती निधन झाले होते.
पुण्यसमरण त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचे लहान बंधू किशोर शिंगणे यांच्या हस्ते सोनू शिंगणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,व सामूहिक श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी विचारमंच अध्यक्ष राम शिंगणे,उपाध्यक्ष रंगा शिंगणे, संघटक आदील पठाण,प्रवक्ते रवी मुळे, कार्यध्यक्ष सचिन नागरे, प्रसिद्धी प्रमुख, अभि शिंगणे, ऋषी वाघ, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष बळी शिंगणे, सुलताने सर,नागरे सर,गजानन म्हस्के,नितेश पालवे, गणेश शिंगणे,वैभव शेळके,अनिकेत अवसरमोल, विशाल पोफळकर, अनिल शिंगणे, सचिन दहातोंडे, यांच्या सह गावकरी मंडळी उपस्थीत होते.


No comments:
Post a Comment