विकासासाठी केला १ लाखाचा कर भरणा
देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
तालुक्यातील आदर्श ग्राम पिंपळगाव चिलमखॉ येथील २७ महिला बचत गटांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायतला विकास कामात हातभार लागावा याकरिता ग्रामपंचायतचा कराचा भरणा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन दिवसात १५ बचत गटांनी १ लाख रुपयांचा कर भरला असून येत्या दोन ते तीन दिवसात उर्वरित १२ महिला बचत गट कराचा भरणा करणार आहेत. यामुळे गाव विकासाला चालना मिळणार आहे.
देऊळगावराजा तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या पिंपळगाव चिलमखॉ आणि किन्ही पवार येथे मागील दोन वर्षांपासून आदर्श ग्राम अंतर्गत विविध विकास कामांना सुरुवात करण्यात आली आहे. तर अनेक कामे लोकसहभागातून करण्यासाठी गावकºयांनी पुढाकार घेतला आहे. गावात अंतर्गत रस्ते, १०० टक्के शौचालयाचे कामे, सांडपाण्याचे व्यवस्थापन, शालेय विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले आहे. तसेच आधुनिक काळानुसार जिल्हा परिषद शाळेत ई-लर्निंग संच बसवून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे. तांड्यावरील सोयी सुविधांपासून वंचित असलेल्या जोशी समाजातील नागरिकांना शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले. यासह इतर सोयी सुविधा पुरवण्यासाठी सरपंच उज्ज्वला दीपक पवार यांनी पुढाकार घेतला. गावात होणाºया या विकास कामांमध्ये कर स्वरूपात आपला देखील हातभार लागावा यासाठी गावातील २७ महिला बचत गटांनी ग्रामपंचायतचा थकीत कर भरण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत यातील १५ बचत गटांनी जवळपास १ लाख रुपयांच्या कराचा भरणा केला आहे. तर उर्वरित १२ महिला बचत गट सुद्धा कर भरण्याच्या तयारीत आहे. कर स्वरूपात मिळणाºया या पैशातून गावातील रखडलेली विकास कामे, थकीत बिले भरण्यास हातभार लागणार आहे. याच प्रमाणे गावकºयांनी सुद्धा कराचा भरणार करून गावाच्या विकासात पुढाकार घ्यावा असे ग्रामपंचायतच्या वतीने कळवण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment