Thursday, December 20, 2018

पिंपळगाव चिलमखॉ ग्रामपंचायतच्या वतीने जनावरांचे लसीकरण

आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या वाढदिवसा निमित्त विविध उपकर्माचे आयोजन
देऊळगावराजा : प्रतिनिधी
      तालुक्यातील पिंपळगाव चिलमखॉ ग्रामपंचायतच्या वतीने गावातील जनावरांचे लसीकरण करण्यात आले. तसेच कमळनाथ येथील गरजू महिलांना सरपंच पती दिपक पवार यांच्या वतीने साडी वाटप करण्यात आले आहे.
  तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत म्हणून पिंपळगाव चिलमखॉ गट ग्रामपंचायतची ओळख निर्माण झाली आहे. गावातील गरजू नागरिकांना वेळावेळी मदत करुन शासकीय मदतीसाठी पाठपुरावा सरपंच उज्वला पवार व त्यांचे पती दिपक पवार नियमितपणे करीत आहे. गेल्या आठवड्यापासून सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. त्यामुळे सामान्यांसह जनावरांच्या देखील आरोग्यावर परिणाम होवु लागला आहे. गोर गरीब शेतकरी बांधवांच्या जनावरांची निगा राखण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने जनावरांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी आ. शशिकांत खेडेकर, नगरसेवक नंदन खेडेकर, सरपंच पती दिपक पवार, ग्रामसेवक बि. यु. तिडके, शरद मान्टे, गणेश मुंढे उपस्थित होते. यावेळी सारंगधर तळेकर, सुधाकर तळेकर, शालिग्राम खुपसे, सुनिल खांडेभराड, राजु डोंगरे, लक्ष्मण तळेकर, उत्तम तळेकर, संदिप तळेकर याच्यासह आदी पशुपालकांच्या पशुंचे लसीकरण करण्यात आले.


1 comment: