Sunday, January 20, 2019

एक शाम संविधान के नाम


टीपू सुल्तान युवा मंच च्या वतीने आयोजन
  देऊळगावराजा : अशरफ पटेल
         भारताची राज्यघटना. प्रत्येक नागरिकाने वाचलंच पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे असं हे पुस्तक. घटना हा आपल्या देशातल्या सर्व कायद्यांचा पाया आहे. म्हणूनच कायदा पाळू इच्छाणाऱ्या सर्वांनाच ही घटना कशी आहे, यामध्ये काय गोष्टी आहेत, याचं भान असणं आवश्यक आहे. २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर आणि अर्थातच अनेक विषयांवरच्या घमासान चर्चेनंतर ही घटना आकारास आली. भारताचं संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. आपण प्रेमाविषयी बोलतो; पण आपण ही राज्यघटना वाचलेली, पाहिलेली तरी असते का? ती मिळवून वाचायला तर हवीच. पण समजून घ्यायचं असेल तर या एक शाम संविधान के नाम या कार्यक्रमात.
           दि.२५ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता स्थानिक बसस्थानक चौकात एक शाम संविधान के नाम या कार्यक्रमाचे आयोजन टीपू सुल्तान युवा मंच च्या वतीने करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमास  प्रमुख व्याखते साहित्यक, लेखक, समीक्षक श्री सुरेश साबळे, कार्यक्रमाचे अद्यक्ष व्यंकटेश महाविद्यलयचे प्रा.डॉ. गजानन जाधव, उदघाटक आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे राहणार आहे. प्रमुख पाहुने म्हणून नागरधयक्षा सौ.सुनीता शिंदे, तहसीलदार दीपक बजाड़, ठानेदार सारंग नवलकार, अॅड.रमेश वयाळ आदि उपस्थित राहणार आहे. तर शहरात होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आहवान टीपू सुल्तान युवा मंच च्या वतीने करण्यात आले आहे

1 comment:

  1. Nation Unity sathi evhadhya chhan programme che aayojan kelyabaddal Tipu Sultan Yuva Manch che jahir aabhar....

    ReplyDelete