| |
| सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातील ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेले अनेक देवस्थाने आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी येतात. येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी सिंदखेडराजा मतदार संघातील तीर्थक्षेत्रासाठी १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी ग्रामविकास विकास मंत्री दादा भुसे यांच्याकडे सिंदखेडराजा मतदार संघातील ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेल्या देवस्थानच्या विकास कामांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी सतत पाठपुरावा केला. मतदार संघातील शिवणी आरमाळ येथील आनंद स्वामी महाराज संस्थान, पिंपळखुटा विठ्ठल रुक्मिणी मंदिर वैष्णगड, सावरगाव माळ क्षेत्र मुक्तधाम आश्रम येथील कामांचा आढाव घेतला. साखरखेर्डा श्री पलसिद्ध मठ, वरूडी तेजस्वीबाबा संस्थान, देऊळगाव मही येथील माळाची देवी संस्थान व जागदरी शंकरेश्वर संस्थानच्या कामासाठी १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. पुढील काही दिवसात या देवस्थानच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांचे स्वीय सहायक संतोष शिंगणे यांनी दिली. |
Saturday, February 2, 2019
सिंदखेडराजा येथील ब वर्ग तीर्थक्षेत्रासाठी १ कोटी ८० लाखांचा निधी
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment