आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या प्रयत्नांना यश
देऊळगाव राजा : प्रतिनिधी
येथील ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी या भागातील जनतेची अनेक वर्षांपासून मागणी होती. सदरहू मागणीसाठी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी या संबंधी सभागृहामध्ये वारंवार मागणी केली. तत्कालीन आरोग्यमंत्री मा.दिपकजी सावंत साहेब यांचेकडे बैठका घेऊन ही मागणी रेटून धरली म्हणुच शेवटी ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झाल्याने अखेर मातृतीर्थ मतदार संघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या प्रयत्नांना यश आले.
गेल्या अनेक वर्षापासून येथील ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी मागणी होती परंतु शासन काढून कोणतीच घोषणा झाली नसल्याने मातृतीर्थ मतदार संघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी वारंवार पाठपुरावा करुण शासनाला मजबूर केले म्हणून शासन निर्णय क्रमांक स्थापना - २०१५ /प्र.क्र.३०७/आरोग्य-३ नुसार ०८ फेब्रुवारी २०१९ रोजी आरोग्य सेवा संचलनालय मुंबई यांनी देऊळगाव राजा जिल्हा बुलडाणा येथील रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास मान्यता दिली आहे. अखेर मातृतीर्थ मतदार संघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या प्रयत्नांना यश आले. अशी माहिती आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांचे स्वीय सहाय्यक विनोद पंडितराव कोल्हे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


Nice work mla saheb
ReplyDeleteNice work sir but xreay suvidha aahe t ka
ReplyDelete