देऊळगावराजा : प्रतिनिधी
कौशल्य विकास व उद्योजकता विभाग बुलढाणा आणि नगरपरिषद श्री शिवाजी हायस्कूल देऊळगाव राजा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ रोजी देळगावराजा राजा येथे करण्यात आले आहे .
शहरातील महात्मा फुले सभागृह, जुनी नगर परिषद प्रशासकीय इमारत, श्री शिवाजी हायस्कूल समोर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आली आहे. या मेळाव्याचे उद्घाटन मा.ना.डॉ रणजीत पाटील (राज्यमंत्री) कौशल्य विकास व उद्योजकता, गृह (नागरी) नगर विकास,संसदीय कामकाज ,भूकंप पुनर्वसन व माजी सैनिकांचे कल्याण महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ शशिकांत खेडेकर, देळगावराजाच्या नगराध्यक्षा सौ सुनिताताई शिंदे हे राहणार आहेत.
या मेळाव्यामध्ये एकूण नऊ नामांकीत कंपन्याचे उद्योजक तथा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून २७५पदांसाठी मुलाखती घेऊन निवड करणार आहेत .यासाठी असंख्य युवक व युवतीना या उपक्रमातून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे तसेच स्वयं- रोजगार कसा करावा ? याचे मार्गदर्शन होणार आहे .तरी परिसरातील जास्तीत जास्त गरजू इच्छुकांनी उपस्थित रहावे असे आव्हान जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलढाणा यांच्यावतीने करण्यात आले आहे.



Great coverage
ReplyDelete