स्वभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसिलदारास निवेदन
देऊळगांव राजा : प्रतिनिधी
जालना ते खामगाव महामार्गाचे देऊळगाव मही येथिल खोदकामामुळे गावाव्यापार्यांना धुळीचा प्रचंड त्रास तील सर्व सामान्य नागरिकांना, व्यापार्यांना धुळीचा प्रचंड त्रास होत असल्या बाबतचे तसेच विस्कळीत वाहतूकीमुळे अपघातात वाढ होत आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम करणारे ठेकेदार कंपनीस यावर तात्काळ उपाय योजना करण्यासाठी आदेशीत करावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा अध्यक्ष सतिष विष्णू मोरे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांचेकडे केली आहे.
मागील काही वर्षांपासून थंडबसत्यात असलेल्या जालना ते खामगाव या महामार्गाचे काम हे काही महिन्यांपासून सुरु झालेले आहे. सदरच्या ठेकेदार कंपनीने देऊळगांव मही या गावातुन जाणारा राष्ट्रीय महामार्ग गेल्या दोन महिन्यांपासून अंदाजे ३ते ४ कि.मी खोदुन ठेवलेला आहे. या राष्ट्रीय महामार्गावरून सतत येणाऱ्या- जाणाऱ्या शेकडो वाहनांमुळे खोदकाम केलेल्या रस्त्यावरील धूळ उडत असल्याने गावातील सर्व सामान्य नागरिकांना, व्यापाऱ्यांना या धुळीचा प्रचंड त्रास होत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर संबंधित ठेकेदार कंपनीने कोणतीच उपाय योजना केली नसल्याने मागील काही दिवसांपासून या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तहसीलदार देऊळगांव राजा यांनी सदर प्रकरणात तात्काळ लक्ष घालुन देऊळगांव मही येथील नागरिकांना धुळीचा त्रास होऊ नये, त्यामुळे अपघातात वाढ होऊ नये यासाठी योग्य त्या उपाय योजना करण्याचे राष्ट्रीय महामार्गाचे काम करणारे कंपनीस निर्देशित करावे तसेच गावातुन जाणाऱ्या महामार्गाचे काम जलदगतीने पुर्ण करण्याचे आदेशीत करावे. अन्यथा आपल्या कार्यप्रणालीचा निषेध नोंदविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा बुलडाणा च्या वतीने दि.५ एप्रिल २०१९ रोजी बस स्थानक चौक देऊळगांव मही येथे बोंबाबोंब आंदोलनासह ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा प्रशासनास देण्यात आला आहे. सदर निवेदनावर सतिष मोरे, शेख जुल्फिकार शेठ, मधुकर शिंगणे, गणेश शिंगणे, पांढरी तेजनकर, गजानन रायते, सचिन साळवे, किशोर शिंदे, इर्शाद भाई, शिवाजी सिरसाट यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


No comments:
Post a Comment