१२ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात
बुलडाणा : प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक – २०१९ साठी जिल्ह्यात १५ उमेदवारांनी २३ अर्ज दाखल केले. छाननीमध्ये २ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. छाननीअंती १३ उमेदवार होते. आज अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी दादाराव बन्सी गायकवाड (अपक्ष) यांनी आपला उमदेवारी अर्ज मागे घेतला. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर बुलडाणा लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात १२ उमेदवार आहेत.
या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. बुलडाणा लोकसभेच्या निवडणूकीसाठी रिंगणात असलेले उमेदवार : अब्दुल हफीज अब्दुल अजीज (बहुजन समाज पार्टी), प्रतापराव गणपतराव जाधव (शिवसेना), डॉ राजेंद्र भास्करराव शिंगणे (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रताप पंढरीनाथ पाटील (बहुजन मुक्ती पार्टी), बळीराम भगवान सिरस्कार (वंचित बहुजन आघाडी), अनंता दत्ता पुरी (अपक्ष), गजानन उत्तम शांताबाई (अपक्ष), दिनकर तुकाराम संबारे (अपक्ष), प्रविण श्रीराम मोरे (अपक्ष), वामनराव गणपतराव आखरे (अपक्ष), भाई विकास प्रकाश नांदवे (अपक्ष) आणि विजय बनवारीलाल मसानी (अपक्ष) निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहे.


No comments:
Post a Comment