Thursday, April 4, 2019

आई,बाबा मतदान करायला जाल तरच मी अभ्यास करेल : तहसिलदार जावरकर



देऊळगावराजा :  (प्रतिनिधी)  
           निवडणूक प्रक्रियेबाबत नव्या व संभाव्य मतदारांच्या, तसेच नागरिकांच्या जाणिवा समृद्ध करणे व नैतिक कर्तव्याचे भान जागविण्याच्या हेतूने प्रत्येक मतदान केंद्रावर चुनाव पाठशाळा तयार करण्यात यावी असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. लोकसंख्या निर्धारित करुन मतदार नोंदणी, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित प्रात्यक्षिकासह नागरिकांना शिक्षित करणे, ईव्हीएम- व्हीव्हीपॅटची ओळख, त्याची वैधता व जनजागृती करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याने आई, बाबा, ताई, दादा मतदान करायला जाल तरच मी अभ्यास करेल असे प्रतिपादन तहसिलदार निकितर जावरकर यांनी केले.
          स्थानिक श्री शिवाजी हायस्कुल येथे दि.४ एप्रिल रोजी विद्यार्थी आणि नागरिकांना त्यांच्या मताची किंमत, निर्भयपणे मतदान करण्याची नैतिक जबाबदारी याबाबत जनजागृती करण्यासाठी मानवी साखळी  निवडणुक आयोगाचे लोगो साकारुन संदेश दिला. पुढे बोलतांना तहसिलदार जावरकर म्हणाल्या की, एव्हरी व्होट काऊंटस आणि नो व्होटर टू बी लेफ्ट बिहाइंड या आयोगाच्या घोषणेनुसार नागरिकांमध्ये निवडणूक प्रक्रियेत सहभाग, मतदान करण्याचे नैतिक कर्तव्य याबाबत समाजात वातवरण तयार करण्यात यावे. व मतदान प्रक्रियेबाबत जनजागृती व्हावी आणि सर्वच निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा, असे आवाहन केले. सुत्रसंचलन आढाव सर तर प्रास्ताविक अजीज शेख मुख्याध्यापक यांनी केले. याप्रसंगी उपविभागीय महसुल अधिकारी विवेक काळे, नायब तहसिलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी चव्हाण, गटशिक्षण अधिकारी मुसदवाले, विस्तार अधिकारी अशोक झिने, दराडे, आरोग्य अधिकारी डॉ.गिते, मातृतीर्थ ताुलका पत्रकार संघाच्या अध्यक्षा सुषमा राऊत, आदी शिक्षक वृुंद, शिक्षकत्तेर कर्मचारी नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
  

No comments:

Post a Comment