Sunday, March 17, 2019

माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीवर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर चेके पाटील

                                     
बुलडाणा : (प्रतिनिधी).

          लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर चेके पाटील यांचा देखील समावेश आहे..
       लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची तत्काळ स्थापना करण्याबाबतचे निर्देश शासनस्तरावरुन देण्यात आले होते. त्याअनुषंगाने बुलडाणा जिल्ह्याची समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांच्या अध्यक्षतेखाली या समितीचे गठण करण्यात आले असून या समितीमध्ये सदस्य म्हणून उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार, दुरदर्शनच्या सहायक वरिष्ठ अभियंता किर्ती बोचरे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर चेके पाटील यांचा समावेश असून सदस्य सचिव म्हणून जिल्हा माहिती अधिकारी एस. के.बावस्कर आहेत. निवडणुकीच्या काळात उमेदवारांचे प्रचार साहित्य, ऑडीओ, व्हिडीओ व इतर प्रचारात्मक बाबींचे प्रमाणिकरण करणे तसेच वृत्तपत्रांच्या माध्यमातून प्रकाशित होणाऱ्या जाहिराती व इतर वृत्तांवर लक्ष ठेऊन त्याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना माहिती देणे. उमेदवारांचा जाहिरातीवर होणाऱ्या खर्चाबाबात संबंधित शासकीय व निवडणूक यंत्रणेला माहिती देणे तसेच प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या माध्यमांकडे लक्ष ठेवणे, वृत्तापत्रात उमेदवार व निवडणुकी संदर्भात प्रकाशित होणारे वृत्त आणि त्यातही विशेष करुन पेडन्यूज याकडे लक्ष ठेवणे यासह इतर महत्वपूर्ण जबाबदारी या समितीकडे असते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या पाच जणांचा समितीमध्ये जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर चेके पाटील यांचा समावेश आहे..

No comments:

Post a Comment