तालुक्यात आतिशबाजी करुण जलोश साजरा
देऊळगांव राजा : प्रतिनिधी
बुलडाणा लोकसभेकरीता राष्ट्रवादीकडून डॉ.राजेंद्र भास्करराव शिंगणे यांचे नाव निश्चत झाल्याने तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनमध्ये जल्लोष पहावयास मिळत आहे.
स्थानिक बस्थानक चौकात तसेच देऊळगांव मही येथे चौकात आतिशबाजी करुण जलोश साजरा करण्यात आले. राष्ट्रवादी- काँग्रेस महाराष्ट्रातील ४८ पैकी २२ जागांवर निवडणूक लढणार आहे. बुलडाणा मधून राजेंद्र शिंगणे, जळगाव गुलाबराव देवकर, मुंबई उत्तर पूर्व संजय दीना पाटील, कोल्हापूर धनंजय महाडिक, परभणी राजेश विटेकर, ठाणे आनंद परांजपे, कल्याण बाबाजी पाटील, हातकणंगले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बरेच दिवसांपासून डॉ.राजेंद्र शिंगणे हे बुलडाणा लोकसभा मतदार संघातील नेते, कार्यकर्त्यांच्या गुप्त बैठकांचे सत्र सुरु असल्याने त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे तेव्हाच चित्र स्पष्ट झाले होते. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्या जागेकरीता राजू शेट्टी आग्रही होते परंतु राष्ट्रवादीने त्यांना पाहिजे तेवढे महत्व दिले नाही. आतिशबाजी करताना जिल्हा परिषद सदस्य रियाजखान पठान, तुकाराम खंडभराड, गजानन पवार, गणेश सवडे, अर्पित मिनसे, संतोष बुरकूल, एल.एम.शिंगने, हाजी आलम खान कोटकर, गजेंद्र शिंगणे, गणेश बुरकुल, अरविंद खंडेभराड, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रविकांत तुपकर करणार का डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा प्रचार ?
रविकांत तुपकर यांना आघाडीकडून बुलडाणा लोकसभेच्या जागेकरीता खुप मोठी आशा होती. परंतु डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे नाव निश्चीत झाल्यामुळे तुपकर हे डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा प्रचार करतील की आपला स्वाभिमान ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून स्वाभिमानाने उमेदवारी दाखल करतील की ‘रणछोडदास’ होतील याकडे बुलडाणा जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. बर्याच कार्यकर्त्यांमध्ये रविकांत तुपकर यांनी आपला बंडाचा झेंडा उभारावा व लोकसभा लढावी असा सुर कार्यकर्त्यांमधून निघत आहे.


No comments:
Post a Comment