Thursday, April 4, 2019

पिरीपा बुलडाणा जिल्हाध्यक्षाविरुद्ध आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल

 
सिंचन विभागाला राजकीय पक्षाच्या लेटरपॅडवर दिलेले पत्र भोवले 
देऊळगावराजा :   प्रतिनिधी
        जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या स्थानिक कार्यालयात पीपल्स रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (कवाडे) या राजकीय पक्षाच्या लेटरपॅडवर पत्र देणे पिरीपा युवा जिल्हाध्यक्षांंना भोवले असून आज मंडळ अधिकाºयांच्या फियार्दीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला. 
         प्राप्त माहितीनुसार पीपल्स रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया कवाडे गटाचे युवा जिल्हाध्यक्ष गौतम त्र्यंबक कासारे वय ४३ यांनी २८ मार्च रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या स्वत: जिल्हा युवा अध्यक्ष असलेल्या लेटरपॅडवर जिल्हा परिषद सिंचन उपविभाग अधिकारी देऊळगाव राजा यांना एका निवेदन स्वरूपात पत्र दिले होते याबाबत संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी महसूल विभागाला अवगत केले होते दरम्यान मंडळ अधिकारी विजय रामचंद्र हिरवे यांच्या फियार्दीवरून पोलिसांनी गौतम कासारे यांच्याविरुद्ध आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार गुन्हा नोंद केला आहे दरम्यान २०१९ लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग झाल्याची देऊळगावराजा तालुक्यातील ही पहिलीच घटना असून रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया च्या युवा जिल्हाध्यक्षांना पक्षाच्या अधिकृत लेटरपॅडवर शासकीय कार्यालयात पत्र देणे भोवले आहे.   

No comments:

Post a Comment