Monday, May 13, 2019

नागरिकांची तहान भागविण्यासाठी दानशूरांचे हात सरसावले


युवा क्रांती संघटनेचे उपक्रम   
  देऊळगावराजा :  प्रतिनिधी    
          शहरात सध्या नियोजनाअभावी पाण्यासाठी नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर एकीकडे राजकीय कलगीतुरा रंगलेला असताना आता शहरवासीयांना दिलासा देण्यासाठी शहरातील युवा क्रांती संघटनेने   पुढाकार घेतला आहे. आपआपल्या परीने यांच्याकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न होत असून या सकारात्मक पावलांमुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे. 
          शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी १७ किलोमीटरवरील संत चोा सागर खडकपूर्णा जलवाहीनी आणण्यात आली. खडकपुर्णा धरणात पाणी असले तरी देऊळगावराजा नगर पालिकाच्या योग्य नियोजनाअभावी व तांत्रिक अडचणीमुळे दिड महिन्यात एकवेळा पाणी येत आहे. यामुळे एकीकडे पाण्यातून अर्थकारण वाढलेले असताना दुसरीकडे राजकारणही चांगलेच तापले आहे. परंतु, अशा परिस्थितीत पाणीटंचाईने होरपळत असलेल्या नागरीकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे.  युवा क्रांती संघटनेने   पदाधिकाºयांनी पाऊल उचलले आहे. याची सुरवात  युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बस्सी त्यांनी गरजेनुसार या प्रत्येक भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.  विशेष म्हणजे मागील आठ  दिवसापासून त्यांच्याकडून मोफत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या पाणीपुरवठ्याबरोबरच पाण्याचा जपून वापर करा असेही त्या आग्रहाने सांगत आहेत. काही भागात हातावर पोट असणाºया नागरिकांना विकतचे पाणी घेणे परवडणारे नाही.  परंतु, या अडचणीच्या काळात अनेकांचे मदतीचे हात पुढे आल्याने समाधान व्यक्त होत आहे. दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचा सामान्य रुग्णालयालाही फटका बसला आहे. त्यामुळे येथे येणाºया रुग्णांसह त्यांच्या नातलगांना बसत आहे.  त्यामुळे युवा क्रांती संघटनेने मोफत पाणीपुरवठा सुरू केला. प्रत्येक गावातील सक्षम व्यक्तीने जर असाच पुढाकार घेतला तर शहरवासीयांची तहान भागली जाईल. प्रशासनाच्या कामात हातभार लावला जाईल. शहर तहानलेले असतांनाही सत्ताधारी व विरोधक फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. युवा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश बस्सी, यश कासारे, अतुल खरात, सिद्धु इंगहे, अतिश खरात, अभय दिडहाते, रामु जाधाव, बंडु राजे व इतर सदस्य व युवाकांनी पुढाकार घेतला. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
  

No comments:

Post a Comment