राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांची उपस्थित, एक लाख रुपयांचा धनादेश प्रदान
देऊळगावराजा : प्रतिनिधी
महाराष्ट्र दिनी दि.१ मे रोजी गडचिरोली तालुक्यातील जांभूरखेडा नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहनाला लक्ष्य करून हल्ला केला. झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात १५ जवान शहीद झाले त्यात बुलढाणा जिल्ह्यातील दोन जवानांचा समावेश असून देउळगावराजा तालुक्यातील आळंद येथील सर्जेराव एकनाथ खार्डे (उर्फ संदीप) तर एक मेहकर येथील राजू गायकवाड़ यांचा समावेश होता या दोद्यांच्या कुटूंबाला प्रत्येकी एक एक लाख रुपायांची आर्थिक मदत माजी आरोग्यमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिली.
तालुक्यातील आळंद येथील सर्जेराव (उर्फ संदीप) एकनाथ खार्डे गडचिरोली जिल्हयातील कुरखेडा पोलिस विभागात सी ६० कमांडो पथकात कार्यरत होते. गडचिरोली तालुक्यातील जांभूरखेडा मध्ये नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहनाला लक्ष्य करून भूसुरंगाच्या हल्ल्यात सर्व जवान शहिद झाले. त्या बुलडाणा जिल्हयातील दोन जवान देऊळगावराजा तालुक्यातील आळंद येथील सर्जेराव एकनाथ खार्डे (उर्फ संदीप) तर एक मेहकर येथील राजू गायकवाड़ यांचा समावेश होता. सर्जेराव खार्डे यांच्या पश्चात आई वडील पत्नी, तीन वर्षाची मुलगी व भाऊ आहे. दि.१२ मे रोजी माजी आरोग्यमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे खार्डे कुटुंबाला आळंद येथे जाऊन सर्जेराव खार्डे यांच्या प्रतिमेचे दर्शन करुन कुटुंबाला एक लाख रुपायांची आर्थिक मदत दिली. त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड.नाझेर काझी, जि.प.सदस्य रियाजखॉ पठाण, मनोज कायंदे, राष्ट्रवादी जिल्हाउपाध्यक्ष डॉ.रामप्रसाद शेळके, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, दिलीपकुमार झोटे, आदी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments:
Post a Comment