Wednesday, May 15, 2019

दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करा; अन्यथा आंदोलन


शिवसंग्रामचा नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना इशारा

देऊळगांवराजा शहराला तब्बल चाळीस दिवसाआड पाणीपुरवठा

देऊळगांव राजा : प्रतिनिधी
देऊळगाव राजा शहराला करण्यात येणारी पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णता कोलमडली असून शहराला चाळीस दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.गेल्या तीन महिन्यापासून ही व्यवस्था कोलमडल्याने शहरातील नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहे. पाणीपुरवठाची कोलमडलेली व्यवस्था तात्काळ सुरळीत करून शहराला आठ दिवसाआड सुरळीत पाणीपुरवठा करा,अन्यथा शिवसंग्राम संघटनेच्या वतीने नगरपालिकेला ताला ठोको आंदोलन करण्याचा इशारा शिवसंग्राम संघटनेने नगरपालिका मुख्यधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
       देऊळगांव राजा शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्याबाबत  नगरपालिकेचा नियोजनशून्य कारभार चव्हाट्यावर येत आहे. या संदर्भात वारंवार मागणी करूनही पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा केली जात नाही. उलट कमी दाबाने पाणीपुरवठा केल्या जात असल्याने नागरिकांनामधून तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे.मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तापमानाने कहर केला आहे.शहरातील अनेक प्रभागातील बोअर कोरडेठाक पडले आहेत.पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गांभीर्याने लक्ष देत नाही. तीन दिवसाआड शहराला पाणीपुरवठा करण्याचे स्वप्न दाखविणाऱ्या देऊळगांवराजा नगरपालिका शहरवासीयांना तब्बल चाळीस दिवसाआड पाणीपुरवठा करत आहे.नगरपालिकेच्या या ढिसाळ कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा मुख्य जलस्त्रोत खडकपूर्णा प्रकल्पात मृतसाठा शिल्लक आहे. मागील सत्ताधाऱ्यांच्या काळातील पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्याचा आरोप करीत नगर पालिकेतील आताच्या सत्ताधाऱ्यांनी राज्य शासनाकडून एक कोटी ७१ लाख रुपयांची पर्यायी तातडीची पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली.सदर योजना ३० मार्च पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते.मात्र आद्यपही या योजनेद्वारे शहराला सुरळीत पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.तापमानाचा पारा चाळीशी गाठत असताना पाणीविक्रेत्यांचे धंदे मात्र नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे  जोरात सुरू आहे. एका टँकरचे सहाशे ते आठशे रुपये मोजावे लागत असून पाणी विक्रेत्यांचे अच्छे दिन आल्याचे चित्र समोर आले आहे. शहरवाशी दररोज पाणी कधी येणार अशी विचारणा करत आहे. मात्र त्यांना उत्तर द्यायला नगरपालिकेचे कर्मचारी व सत्ताधारी कोणीही धजावत नाही.चाळीस दिवसाने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने अनेक जन आपली हातावरची कामे सोडून पाण्यासाठी भटकंती करत आहे.मात्र शहराला लवकरच दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल असे पोकळ अस्वासन सत्ताधारी व नगरपालिकेचे कर्मचारी देत असून प्रत्येक्षात मात्र फोल ठरत आहे.नगर पालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे धरणात पाणी असताना देखील सुरळीत पाणी पुरवठा केल्या जात नाही.शहराला तात्काळ सुरळीत आठ दिवसाआड पाणी पुरवठा करावा. तसेच शहराला पाणी पुरवठा करण्या संदर्भात नगर पालिका दुर्लक्ष करीत असल्याने चार महिन्याची पाणीपट्टी माफ करावी, अन्यथा शिवसंग्राम संघटनेच्या वतीने नगरपालिकेला ताला ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, तालुका संघटक जहीर खान, अजमत खान, विनायक अनपट, सुरेश निकाळजे, विनोद खार्डे, संतोष हिवाळे, मदन डुरे यादीच्या स्वाक्षऱ्या आहे.

No comments:

Post a Comment