यकृत दिनानिमित्त यकृतदात्यांचा गौरव,
माजी नगराध्यक्ष कविश जिंतूरकर यकृतच्या आजारावर मात
देऊळगावराजा : प्रतिनिधी
जागतिक यकृत दिनाचे औचित्य साधून सह्याद्री हॉस्पिटल्यतर्फे मोफत यकृत तपासी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबीरामध्ये शहरातील माजी नगराध्यक्ष कविश जिंतूरकर हे यकृत आजाराने त्रस्त होते. त्यासाठी अनेक रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना योग्य निदनाद्वारे यकृत बदलीचे निर्णय घेवून त्यांची पत्नी माजी नगरसेविका रिता जिंतूरकर यांनी यकृत देवून नविन जिवन प्रदान केले. त्यांच्या यकृत दातृत्याची दखल सह्याद्री हॉस्पिटल ने घेवून यकृत दिनाचे औचित्य साधून जिंतूरकर दामपंत्याला लिव्हर चॅम्पियन्स म्हणून सन्मानित करण्यात आले.
यकृत हा स्वत:ला दुरुस्त करण्याची प्रचंड शक्ती असलेला अवयव आहे. त्याच्यात इतर गोष्टी दुरुस्त करण्याची क्षमता असते. बºयाच आजारांमुळे अल्कोहोल, फॅट, विषाणू, औषधांमुळे यकृताला इजा होते. त्याच्यावर इलाज केले तरी यकृत स्वत:ला दुरुस्त करू शकतो. दुसरा उपाय म्हणजे एखाद्या व्यक्तीचं ६० टक्के यकृत काढून टाकलं, तरी ते पुन्हा येऊ शकतं. ज्या कारणामुळे यकृताचा आजार झाला होतो यकृत हा स्वत:ला दुरुस्त करण्याची प्रचंड शक्ती असलेला अवयव आहे. शहरातील उद्योगपती तथा माजी नगराध्यक्ष कविश जिंतूरकर एका वर्षापासून यकृतच्या आजाराने त्रस्त होते. या गुतागुतीच्या यकृताच्या आजारावर एकमेव उपाय हा यकृत ट्रान्सफरम असल्याने त्याची संपूर्ण चौकशी व प्रतिबंधकता संबंधित निदान सह्याद्री हॉस्पिटल पूणे येथील डॉ.जिरपे आणि डॉ.विभूते यांच्याशी चर्चा करून पती कविश जिंतूरकर यांना यकृत देण्याचा निर्णय माजी नगरसेविका रिता जिंतूकर यांनी घेतला आणि पूणे येथील सह्याद्री हॉस्पिटल मध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आले. त्या यशस्वी शस्त्रक्रियेला सहा महिने पूर्ण झाले आज रोजी रुग्ण व रुग्णदाते जिंतूकर दामपंत्य निरोगी आहे आणि आपला सुखी जिवन व्यतीत करीत आहे. सह्याद्री हॉस्पिटलच्या वतीने यकृत दिनाचे औचित्य साधून यकृतच्या प्रत्यारोपणाशी लढा देणारे जिंतूरकर दामपंत्याला लिव्हर चॅम्पियन्स म्हणून औरंगाबाद येथील सिग्मा हॉस्पिटल येथे सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ.मनिष पाठक सह डॉक्टर व कर्मचारी यांच्या उपस्थितीत होते.


Great job...heartly thanks to sahyandri team...and best wishes for future.
ReplyDelete