निवेदन सादर ६२ गावे दुष्काळाने होरपळून निघाल
देऊळगावराजा : प़़्रतिनिधी
तालुक्यात दुष्काळाची दाहकता प्रचंड प्रमाणात वाढली असून या परिस्थितीला अपवाद नाही. तालुक्यातील ६२ गावे दुष्काळाने होरपळून निघाले असून शेतकरी, शेतमजूर, नागरीकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने दुष्काळी भागाचा दौरा केला. यातून निदर्शनास आलेल्या चारा छावण्या, पाणी टंचाई सारख्या समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मंगळवारी करण्यात आली.
या संदर्भात राष्ट्रवादी पक्षाच्या तालुक्यातील पदाधिकाºयांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करीत तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, फळबागांच्या नुकसानीची भरपाई तात्काळ द्यावी. तालुक्यात चारा छावण्या सुरु करुन छावण्यांचे अनुदान वाढवावे. छावणीत पशू वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती करावी. शेतकºयांंसाठी झुणका भाकर केंद्र सुरु करावे आणि छावणीसाठी असलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात. तसेच प्रत्येक गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा. बोगस रासायनिक खत कारखान्याची सीआयडी मार्फत चौकशी करावी. पाण्याच्या टाक्यांच्या वाटप करावे. खरीप हंगामासाठी तात्काळ पीक कर्ज वाटप सुरु करावे. मंजूर शेततळ्यांना प्लास्टीक द्यावे. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आदींना मुख्यालयी राहण्याविषयी सक्त आदेश द्यावेत. रोजगार हमीची कामे सुुरु करावीत. पिक विम्याची रक्कम तात्काळ शेतकºयांच्या बँक खात्यात वर्ग करावी आदी मागण्यांचा यात समावेश आहे. या निवेदनावर माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, विधानसभा अध्यक्ष गजानन पवार, गंगाधर जाधव, रंगनाथराव कोल्हे, गणेश सवडे, हरीश शेटे, धनंजय मोहिते, विलास शेळके, नवनाथ गोमधरे, नितीन कणखर, राजु चित्ते, गजेंद्र शिंगणे, पाराजी खांडेभराड, संतोष शिंदे, बद्रिनाथ शिंदे, राजु सिरसाट, सदाशिव मुंडे, अरविंद खांडेभराड, संतोष बुरकुल, देशमुख, रामु खांडेभराड, हर्षवर्धन देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.



No comments:
Post a Comment