खडकपुणार्तून पाणी घेण्याचा नाद सोडला,
डॉ राजेंद्र शिंगणे साहेब आणि पाणी बचाव समितीच्या विरोधाला यश
देऊळगावराजा : प़़्रतिनिधी
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यकमा अंतर्गत जालना जिल्ह्यातील परतुर, मंठा आणि जालना शहरासह ९२ गावांसाठी प्रस्तावित ग्रिड पाणी पुरवठा योजनेच्या विहीर खोदकामास खड़कपूर्णा प्रकाल्पच्या बुडित क्षेत्रात प्रारंभ करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज दि.२८ जानेवारी रोजी भगवान बाबा चौकातून पण्याच्या धडक मोर्चा काढून निषेध करण्यात आले होते. या मोर्च्यात आजी माजी आमदारांसह सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते. संत चोखा सागर खडकपुर्णा प्रकल्पातुन जालना जिल्हातील ९२ गावांना फिल्टर पाणीपुरवठा करणा-या वॉटरग्रीड योजना कायमस्वरूपी रद्द करा. या मागणीसाठी देऊळगावराजा व सिदखेडराजा मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्यांच्या विरोधानंतर खडकपुणार्चा नाद सोडुन वाजोळा ( ता. मंठा ) येथून ९२ गावांची वॉटरग्रीड योजनेला पाणी मिळणार आहे. त्यामुळे मातृतीर्थ मतदार संघातील पाणी बचाव समिती व राजकीय नेतृत्वापुढे पाणीपुरवठा मंत्र्याना झुकावे लागले. अशी चर्चा विरोधकात रंगत आहे.
पाणीपुरवठा मंञी बबनराव लोणीकर यांनी जालना तालुक्यातील ३३ , परतुर तालुक्यातील ८ व मंठा तालुक्यातील ५१ गावांतील १ लाख ५० हजार लोकांना फिल्टर पाणी देणारी महत्वाकांक्षी योजना होती. या योजनेसाठी ११७.३९ कोटींचा खर्च होणार असून या योजनेला मुख्य स्रोत हा खडक पुर्णा नदीवरील धरणाच्या पाण्यावर अवलंबून होता. गेल्या अनेक वर्षांनंतर कायमस्वरूपी पाणीप्रश्न सोडविणा-या वॉटरग्रीडमधून ९२ गावांतील दिडलाख जनतेला शुद्ध व मुबलक पिण्याचे पाणी केवळ ७ रुपयांत १ हजार लिटर पाणी मिळणार असल्याने ही योजना पूर्ण होणे गरजेचे होती. मातृतीर्थ मतदार सांघाचे माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व सर्व पक्षीय नेत्यांनी पाण्याचा एक थेंबही घेऊ देणार नाही. अशी भूमिका घेत सर्वप्रथम विरोध केला. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी ९२ गावांना फिल्टर पाणीपुरवठा करणा-या वॉटरग्रीड योजना कायमस्वरूपी रद्द करा. या मागणीसाठी देऊळगावराजा येथे रास्ता रोको तर सिदखेडराजा बंद पाळून जिल्हाभर आंदोलने केली होती. खडकपुर्णा विहिरीचे कामही बंद पाडले होते. त्यानंतरही पाणीपुरवठा मंञी लोणिकरांकडून वॉटरग्रीडसाठी सत्तापणाला लावली होती. माञ, मातृतीर्थ मतदार संघातील सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रखर विरोधामुळे आता खडकपुर्णा ऐवजी वाजोळा येथून ९२ गावांची वॉटरग्रीड योजनेला पाणी मिळणार आहे. विदभार्तील विरोधी नेतृत्वापुढे सत्ताधारी असलेल्या पाणीपुरवठा मंञी बबनराव लोणीकर यांना माघार घ्यावी लागली आहे. हे तितकेच खरे ...
खडकपुर्णा ऐवजी वाजोळा येथून पाणी घेणार - ना. लोणीकर
खडकपुणार्चे पाणी कमी दरात व पंपीग न करता ९२ गावांना मिळाले असते. पण, वर्षभरापासून बुलढाणेकर पाणी घेऊ देईना. आपण खडकपुर्णात कलेक्टर, एसपी , १०० पोलीस अधिकारी बसविले होते. लाठीचार्ज, गोळीबार व रक्तपात करुन पाणी घ्यायचे नसल्यामुळे खडकपुणार्चा नाद सोडून दिला. आता वाजोळा ( ता. मंठा ) येथून पाणी घेणार आहे. सध्या पाईपलाईन आथरणे, टाक्या बांधण्याचे काम सुरु झाले. १४० कोटीची खर्च होणार असल्याचे ना. लोणीकर यांनी दुष्काळी पाहणी दौ-यात नागरिकांशी संवाद साधताना सांगितले.



No comments:
Post a Comment