देऊळगावराजा : प्रतिनिधी
गेल्या तिन ते चार महिण्यापासून शहरातील जुना जालना मार्गावरील मदिन कॉमप्लॅक्स आणि परिसरात व्यावसायिक व नागरिक त्यांच्यावर हल्ले व दुकानाचे नुकसान करणाºया माकडाला जेरबंद करा अशी मागणी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे दि.२७ मे रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शहरातील जुना जालना मार्गावरील गेल्या तिन ते चार महिण्यापासून संध्याकाळाच्या वेळी उच्छाद घालणारे माकडाला जेरबंद करण्याची मागणी जोर धरत आहे. जुना जालना रोड वर या माकडाने धुमाकूळ घातला होता. माकडाच्या धूमाकूळ मुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. या परिसरातील व्यवसायिकांनी माकडाला पकडण्याची मागणी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे केली आहे. या निवेदनावर मोहम्मद अक्रम, जावेद खान, शिरीष जैन, शुभम बन्सीले, आरीफ पटेल, नईम टेलर, डॉ.मोबीन, दिपेश कालवाडीया, अंबुसकर, शाहिद पटेल, शेख जाकीर, शकील खान आदींच्या स्वाक्षºया आहेत.


No comments:
Post a Comment