Saturday, June 1, 2019

जिल्हा परिषदेच्या रस्त्याचे भाग्य उजाळणार


आमदार डॉ शशिकांत खेडेकर  यांच्या पुढाकाराने रस्ते विकासासाठी 10 कोटींचा निधी मंजूर

जिल्हा परिषद च्या रस्ते होणार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून

देऊळगांव राजा : प्रतिनिधी
       ग्रामीण भागातील रस्ते ह्या ग्रामीण भागाच्या धमन्या असतात त्यामुळे गत काही काळापासून मतदारसंघातिल  रस्ते गुळगुळीत करण्याचा  ध्यास खा.प्रतापराव जाधव याच्या  नेतृत्वात आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांचा प्रयत्न सुरू असून  जवळपास दहा कोटी रुपये विकास निधिमंजूर झाला आहे.
      सिंदखेडराजा मतदारसंघातील अनेक रस्ते मार्गी लागत असताना  अनेक गावातील रस्त्याची मागणी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांच्याकडे येत होती मात्र सदर रस्ते जिल्हा परिषदेच्या मालकीची  असल्याने राज्य सरकारच्या माध्यमातून करणे शक्य नव्हते मात्र  मतदार संघातील गावे विकासापासून वंचीत राहू नये म्हणून आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी सदर रस्ते  जिल्हा परिषद मालकीची असणारे रस्ते दर्जाची वाढ करून राज्य सरकारच्या निधीतून  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात यावी यासाठी विधिमंडळात  सतत पाठपुरावा केला अन यश देखील मिळालं यामध्ये  देऊळगाव राजा तालुक्यातील गिरोली, निमखेड,तुळजापूर ते  बोराखेडी रस्त्यासाठी २ कोटी ५० लाख रुपये सिंदखेडराजा तालुक्यातील  साठेगाव सावंगी ते  सावखेड तेजन या रस्त्यासाठी   २ कोटी ५० लाख रुपयांची विकास निधी मंजूर झाला बायगाव शिवणी आरमाळ ते  सुरा, सरबा, नारायण खेड रस्त्यासाठी १ कोटी ५० असोला जहागीर ते  शिवणी टाका डावरगाव रस्त्यासाठी ७५  लाख रुपयांचा निधी , जळुका  पिपंळगाव कुडा रुम्हणा, सोयदेव धानोरा रस्तासाठी ७५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. ग्रामीण भागातील लोकांसाठी दळणवळण करणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे  या रस्त्यावरून अनेक गावातील नागरिक ये जा करतात मात्र  राहेरी पूल बंद झाल्याने अनेक जड वाहने या रस्त्याने गेली आणि रस्त्याची दयनीय अवस्था झाली सदर रस्ता मजबुती व डांबरीकरण करावं अशी मागणी परिसरातिल नागरिकांनी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांच्याकडे केली त्यांनी पुरवा केला आणि त्यांच्या प्रयत्नला या रस्त्यासाठी निधी मंजूर झाल्या बद्दल परिसरात नागरिकनी आमदार डॉ खेडेकर यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment