जय मल्हार मित्र मंडळा चा अभिनव उपक्रम
देऊळगाव राजा : प्रतिनिधी
देऊळगाव मही येथे गेल्या अनेक वर्षांपासून अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त डीजे नादात मिरवणूक काढून जयंती साजरी केली जाते यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसाचा अपयव्ह तर होतोच शिवाय अन्य घडामोडी घडतात त्यामुळे होणारा खर्च टाळून डीग्रस येथील शेख अफसर हे अपघातात गंभीर जखमी असून त्यांच्या वर औरंगाबाद येथे उपचार चालू असून त्याला आर्थिक मदत करण्याचा निर्णय येथील जय मल्हार मित्र मंडळ यांनी घेतली. अहिल्यादेवी होळकर यांनी दिलेल्या मानवतेच्या शिकवणीनुसार धनगर समाजाने एक नवीन आदर्श उभा केला आहे. ‘माणुसकी अजूनही जिवंत आहे’ याची प्रचिती यानिमित्ताने पहायला मिळाली.
देऊळगाव मही येथील जय मल्हार मित्र मंडळ नेहमी समाज सुधारणा व मानवतावादी कामांसाठी उपक्रम राबवतात गेल्या पंधरवड्यात डीग्रसगावातील साधारण परिस्थिती असलेले शेख अफसर हे देऊळगाव मही येथे कामानिमित्त येत असताना त्यांच्या देऊळगाव मही नजीक अपघात झाला यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली परिस्थिती हलाकीची असल्याने खाजगी दवाखान्यात उपचार करणे शक्य नव्हते मात्र देऊळगाव मही येथील सै वाहेद यांनी सोशल मीडियावर मदतीचे आव्हान केले त्यामुळे अनेक मदतीचे हाथ समोर आले यामध्ये देऊळगाव मही येथील युवकांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवर यंदा होणारा खर्च गोळा करून समाजाच्या या बांधिलकीने शेख अफसर यांना आर्थिक मदत केली यावेळी भगवान जोशी,भगवान कुरधणे,विष्णू तायडे,अनिल मतकर, पंढरीनाथ जोशी,नितीन बकाल, श्रीराम बनसोडे, दीपक पंडीत,गजानन गुरव,जगणं कुरधणे, पवन मतकर,रवींद्र पानासे ,केशव पंडित,नागेश तेलगे आदी मंडळी उपस्थित होते


No comments:
Post a Comment