तालुक्यात खुलेआम गुटखा विक्री,
जागतिक तंबाखू विरोधी दिन शासनाचे परिपत्रक नावालाच
देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
शाळेच्या आवारात किंवा वर्गात शिक्षक कर्मचारीवर्ग तंबाखू, तंबाखूयुक्त पान, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ खात असल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर होतो. विद्यार्थी त्याकडे आकर्षित होऊ शकतात. म्हणून शिक्षक, कर्मचा?्यांनी शाळांच्या आवारात तंबाखू तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये, असेही शासनाने २०१५ रोजी काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे. परंतु या परिपत्रकाकडे दुर्लक्ष केले जाते..कारण आज रोजी देऊळगावराजा तालुक्यात खुलेआम गुटखा विक्री होत आहे. त्यात दररोज लाखो रुपयाची उलाढाला होते त्यावर संबंधित प्रशासनाचे मात्र दुलर्क्ष होतांना दिसून येत आहे.
भारतात तंबाखूविरोधात कायदा असला तरी त्यासंदर्भात जाणीव तसेच जागरूकता समाजात निर्माण झाली नाही. कारण कायद्याची कठोर अंमलबजावणी होत नाही. तंबाखूच्या निर्मूलनासाठी सामाजिक समर्थनाची नितांत गरज आहे. निव्वळ कायदे करून प्रश्न सुटणार नाही, तर समाजातील घटकाने याची जाणीव करून घेऊन दुसºयांनाही त्याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. तंबाखूच्या दुष्परिणामापासून लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, यासाठी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे ३१ मे हा दिवस 'जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन' म्हणून साजरा केला जातो.. देशात प्रौढ व्यक्तींमध्ये तंबाखू खाणाºयांचे व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण अधिक असून, आता हे लोण लहान मुलांमध्येही पोहोचले आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन, साठवणूक व विक्री करण्यावर राज्य शासनाने बंदी घातली असली, तरी योग्य अंमलबजावणी होत नसल्याने त्याचा 'फज्जा' उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. तंबाखूच्या धुरात व धूम्रपानात डीडीटी, बुटेन, सायनाईड, अमोनिया आदी रसायने आढळतात. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुफ्फुस, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, गर्भाशय, मुखाचा कर्करोग होतो. तंबाखूच्या सेवनाने त्यातील निकोटीनच्या प्रभावामुळे मेंदूचे कार्य थांबते. मेंदूची विचार करण्याची क्षमता कमी होते. तसेच जे लोक धूम्रपान करतात त्यांना हृदयघात होण्याची शक्यता अधिक असते. शासनाने तंबाखूच्या विरोधात अनेक कायदे केले असून, त्याची अंमलबजावणी मात्र तंतोतंत होताना दिसत नाही. त्यामुळे नियमांचे उल्लंघन होत आहे. कोवळी मने संस्कारक्षम असतात. मोठ्यांचे अवलोकन करून त्यांचे चांगले-वाईट गुण विद्यार्थी अंगीकारतात. तेव्हा शिक्षकांनी तंबाखूच्या उच्चाटनासंदर्भात पुढे येणे गरजेचे आहे. तंबाखू शरीरासाठी कशी वाईट परिणाम करणारी आहे, याची सविस्तर माहिती अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे व ही चळवळ शाळा तसेच महाविद्यालयातून चालवणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने एका आदेशान्वये सुगंधित तंबाखू, सुपारी, पानमसाला व गुटख्याचे उत्पादन, विक्री, साठवणूक, वाहतूक व वितरणावर बंदी घातलेली आहे. असे असतानाही या प्रतिबंधित वस्तू तालुक्यास पान टपºया, किराणर दुकान, हॉटेल मध्ये खुलेआम मिळत आहेत. त्यामुळे राज्य शासनाची बंदी कुचकामी ठरली आहे.


No comments:
Post a Comment