युवा क्रांतीच्या युवकांकडून मदतीचा हात
देऊळगावराजा : प्रतिनिधी
मागील आठवाड्यात चिखली बाजार समिती आवारामध्ये आपल्या कुटूंबातील सदस्या सोबत झोपलेल्या ९ वर्षीय चिमुरडीला दोन नराधमांनी उचलून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली होती. सदर पीडित मुलीस लोकसहभागतून ४१ हजार रुपयांची मदत देऊन युवा क्रांतीच्या युवकांनी सामाजिक बांधिलकी जोपासुन शहरात एक आदर्श निर्माण केला.
तालुक्यातील युवा क्रांती संघअनेच्या युवकांनी शहरात फिरुवून सदर चिमुकलीच्या उपचारासाठी एका बंद डब्या मध्ये प्रत्येक माणसांकडून जी मिळेल ती मदत जमा केली. व या जमा पूजीं मध्ये तब्बल ४१ हजार जमा होवून सदर पीडित मुलीच्या उपचारासाठी कुटूंबाकडे सुपूर्द केली. त्यावेळी संघटनेच्या अध्यक्ष प्रकाश बस्सी, उपाध्यक्ष यश कासारे, अतूल खरात, राहूल बनसोडे, सिद्धु इंगळे, बलवंत बावरे, गणेश तिरुखे व इतर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment