Sunday, June 16, 2019

शिवसेना पदाधिकारी बोरकरवर अट्रॉसिटी गुन्हा दाखल,


 
 शहरातील अट्रॉसिटी दुसरी घटना
न.प.उपाध्यक्ष पदाचे मतदान करण्याच्या कारणाना वरुन वाद
  नगरसेविकेची तक्रार,   
 देऊळगावराजा : (प्रतिनिधी)  
        येणाºया काळात नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या न.प. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जातीवाचक बोलल्याने शिवसेनेच्या जिल्हा उपप्रमुख दीपक बोरकर यांच्यासह एका विरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी चा गुन्हा  शनिवारी रात्री उशिरा नोंदविण्यात आला विशेष म्हणजे सदर गंभीर स्वरूपाचा गुन्हा शिवसेनेच्या नगरसेविका नंदाताई संदीप कटारे यांच्या तक्रारीवरुन दाखल करण्यात आला आहे.                        
           पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या नगरसेविका सौ.नंदा संदिप कटारे यांनी दि.१५ जुनरोजी रात्री ११ वाजता पोलिसात हजर होऊन तक्रार नोंदविली सदर तक्रारीत नमूद केले की दि.१३ जुन रोजी नवनिर्वाचित खासदर प्रतापराव जाधव यांचा नगरपालिकेच्या सभागृहातील नागरी सत्काराचा कार्यक्रम आटोपून मी त्र्यंबकनगर येथील घरी परतले थोड्या वेळाने घरामध्ये मी एकटीच असतांना शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख दिपक आसाराम बोरकर हे घरी येऊन नगरपालिकेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माझ्या पत्नी रेखा बोरकर यांनाच मतदान करा असे मला म्हटले यावर मतदान हा माझा हक्क असून कोणाला द्यायचा का नाही ते निर्णय आम्ही घेणार असं म्हटल्यावर दीपक बोरकर यानी मला जातीवाचक शिवीगाळ करून तुम्ही जातीवरच येऊन औकात दाखवणार असे म्हणून  अपमानित केले व धमकावले, त्यानंतर माझा मुलगा पार्थ हा घराबाहेर खेळत  असतांना दीपक सजेर्राव खराट याने त्याला दीपक बोरकरच्या म्हणण्यावर तुम्ही काय निर्णय घेतला असे विचारले यावर माझ्या मुलाने मला माहीत नाही असे उत्तर देताच त्याने चिडुन जाऊन माझ्या मुलाला मारायला सुरुवात केली आवाज ऐकुन मी मुलाला वाचवण्यासाठी गेली असता मला सुद्धा मारहाण केली, जातीचा उद्धार करत तुम्ही खुप माजलात, तुम्हाला तुमची जागा दाखवतो, जातीवाचक शिवीगाळ करून पतीला जिवंत मारण्याची धमकी दिली घडलेल्या प्रकाराने भयभीत झालेल्या नगरसेविका नंदा संदीप कटारे यांनी दि.१५ जुन रोजी रात्री पोलीस स्टेशन पोहचले व ठाणेदार संभाजी पाटील यांच्यापुढे घडलेला प्रकार दाखविला. ठाणेदारांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका सौ.नंदा संदीप कटारे यांची तक्रारी दाखल करून घेत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख दीपक आसाराम बोरकर, दीपक सजेर्राव खराट यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा,  शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा उपविभागीय पोलीस अधिकारी भिमानंद नलावडे तपास करीत असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
             




 
 

 
 

 

No comments:

Post a Comment