
आमदार डॉ.खेडेकर यांच्या प्रयत्नाला यश
देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील व शहरी भागातील रस्ते या दळणवळण करण्यासाठी सातत्याने गत काही काळापासून मतदारसंघातील रस्ते गुळगुळीत करण्याचा ध्यास खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी घेतला सातत्याने मंत्रालय येथे वारंवार पाठपुरावा करून भरीव तरतूद करण्यासाठी दि.१८ जुन रोजी महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये सिदंखेड राजा मतदार संघाला अत्यंत महत्त्वाचे रस्ते व पुलांच्या कामासाठी २१ कोटी १८ लक्ष निधी मिळाला.यामध्ये
अमडापूर लव्हाळा दुसरबीड राहिली वर्दडी ते जिल्हा सीमा पर्यंत रस्ता रामा २२२ किमी लांबीची सुधारणा करण्यासाठी २ कोटी रुपये, राज्य मार्ग राज्यमार्ग ५१ ते जळुका पिंपळगाव कुडा ते लिंगा देवखेड रूम्हणा सोयंदेव धानोरा जिल्हा रस्ता प्रजिमा ९७ की मी मध्ये खडकपूर्णा नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी ५ कोटी रुपये मंजूर, अमडापूर लव्हाळा दुसरबिड राहेरी वर्दडी ते जिल्हा सीमा पर्यंत रस्ता २२२ किमी 13 लांबीची सुधारणा करण्यासाठी १ कोटी २० लक्ष रुपये, राज्यमार्ग २२२ शेंदुर्जन सायाळा कळपविहीर बरटाळा मेहकर रस्ता प्रजिमा ९२ कि मी मध्ये सुधारणा करण्यासाठी १ कोटी रुपये, अमडापूर लव्हाळा दुसरबिड राहेरी वर्दडीते जिल्हा सीमा पर्यंत रस्ता रामा २२२ किमी या लांबीची सुधारणा करण्यासाठी १ कोटी ५० लक्ष, सावंगी वाघजाई जळगाव सावखेड तेजन वाघोरा ते प्रमुख जिल्हा मार्ग ३७ पर्यंत रस्ता प्रजिमा ९८ की मी सुधारणा करण्यासाठी २ कोटी ५० लक्ष, सिंनगाव जहागीर ते मेहुणा राजा रामा १३ ते रोहणा सावंगी टेकाळे हिवरखेड पूर्णा किनगाव राजा उमरद आडगाव राजा चिचोली रस्ता प्रजिमा ३७ किमी सुधारणा करण्यासाठी ८४ लक्ष, अमडापूर लव्हाळा दुसरबीड राहेरी वर्दडी ते जिल्हा सीमा पर्यंत रस्ता रामा २२२ किमी लांबीची रुंदीकरणास सह सुधारणा करण्यासाठी १ कोटी ५० लक्ष तसेच रस्ते दुरुस्तीच्या कार्यक्रमांमध्ये सुलतानपूर सिंदखेड राजा जालना सीमा हद्द हा प्रमुख रस्ता प्ररामा १२ करीता मधील सुधारणा करण्यासाठी ५ कोटी ६४ लक्ष मंजूर झाल्याची माहिती स्विय सहाय्यक संतोष शिंगणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
मातृतीर्थ मतदार संघाचे सर्व रस्ते सुधरणार
गेल्या २० वर्षा पासून मातृर्ती मतदार संघाचे रस्त्यांची स्थितीत अत्यंत बिकट झाली होती या रस्त्यावर पायी चालने कठीन झाले होते. मागील चार वर्षात मतदार संघातील १७८ गावात जाण्यासाठी नविन रस्त्यांसयाठी निधी उपलब्ध करुन दिली तर येणाºया काळात मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी कटिब्ध आहे.
डॉ.शशिकांत खेडेकर, आमदार सिंदखेडराजा मतदार संघ


No comments:
Post a Comment