नगर पालिका आणि बांधकाम विभाग कारवाई करण्यास उदासिन
देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
नागरिकांना स्वच्छ, सुंदर फुटपाथ मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. फुटपाथच्या हक्कासाठी यावर्षी शहरातून जाणारा नागपूर पुणे मुख्य महामार्गावरील नविन रस्त्याचे काम करण्यात आले. मधल्या भागी डिवायडर आणि रस्त्याचे दोन्ही बाजुला नागरिकांसाठी फुटपाथ तयार करण्यात आले. तर बस स्थानक चौका पासून ते संतोष चौका पर्यंत फुटपाथावर अतिक्रमण करुन दुकाने थाटण्यात आलेली आहे. नविनच झालेल्या फुटपाथ वर नागरिकांना चालता येत नसल्यानी मोठा अपघात होण्याची शक्यता नकारता येत नाही. तर नगर पालिके व बांधकाम विभागाकडून कोणतीच दखल घेण्यात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. फुटपाथच्या समस्यांवर प्रशासनाला कारवाई करता येईल का पुन्हा फूटपाथ अतिक्रमणात गायब होणार अशी भिती निर्माण झालेली आहे.
देऊळगावराजा शहर सुदंर ठेवण्यासाठी नगर पालिका प्रशसना कडून नविन योजनेत शहराचा विकास करण्यात येत आहे. परंतु फुटपाथवरील अतिक्रमणाबाबत नगर पालिका प्रशासन व बांधकाम विभाग उदासिन दिसत आहे. फुटपाथवर पहिला अधिकार नागरिकांचा आहे, त्यानंतर फुटपाथवरच्या अवैध बांधकामांवर पालिकेने कोणतीच कारवाई केली नाही बस स्थानक चौकात फुटपाथवर बांधकाम करुन दुकाने थाटण्यात येत आहे. तर काही ठिकाणी दुकाना समोरील फुटपाथ भाड्याने देण्याचे काम शहरात सुरु आहे. पावसाळा सुरु झाला आणि साथीचे आजार पसरत असल्याने फुटपाथवर थाटलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सच्या विरोधात मोहीम सुरू करण्याची गरज आहे. आता काही राजकीय पुढाºयांच्या नावावर फुटपाथवर अतिक्रमण केल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. फूटपाथ नसलेले शहर म्हणजे असे जर कोणी आपल्या शहराचे वर्णन केले तर चूक ठरू नये, अशी स्थिती आहे. शहरातील दहा टक्क्यांपेक्षा जास्त रस्त्यांवर फूटपाथच नाहीत आणि त्यापैकी ज्या रस्त्यांवर फूटपाथ आहेत, त्यातील अर्ध्याअधिक फूटपाथवर सर्रास पक्की अतिक्रमणे झाली आहेत. जे काही फूटपाथ अतिक्रमणांपासून वाचले आहेत, त्यातील बहुतांश वापरण्याजोगे राहिलेले नाहीत. शहरांमध्ये फूटपाथ हा वाहतुकीचा महत्त्वाचा भाग मानला जातो, शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था एवढी वाईट आहे की, फूटपाथ हा तर नंतरचा विषय म्हणून कायमस्वरुपी दुर्लक्षित विषय राहिला आहे. फूटपाथवरील वषार्नुवर्षांच्या पक्क्या अतिक्रमाणांकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. कधीतरी एखाद्यावेळेस अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई करण्याची गरज निर्माण झालेली आहे. बस स्थानक चौकातील फुटपाथवर नगर पालिका व्यपारी संकुल समोर भाजी बाजार, फ्रुट स्टॉल, हॉटेल, ज्युस स्टॉल, छोट्या मोठ्या हात गाड्या लावण्यात येते तसेच या मुख्य मार्गावरील येणाºया जाणाºया वाहनाची रेल चेल मुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नकारता येत नाही. तर नगर पालिका प्रशासनाने हरवले फूटपाथ अतिक्रमणात पुन्हा हटविण्याचे काम करावे त्यामुळे स्वच्छ शहर सुदंर शहर म्हणून देऊळगावराजा शहराची ओळख होणार. त्वरीत कारवाई केली नाही तर राहिलेले फुटपाथावर अतिक्रमण वाडणार आहे, अशी चर्चा चौका चौकात रंगत आहे.



No comments:
Post a Comment