Thursday, June 13, 2019

तालुक्यातील श्री गुगुळा माता मंदिर परिसर लोकसहभागातून होणार पाणीदार,


   देऊळगावराजा :  (प्रतिनिधी)
          बुलडाणा जिल्हा सुजलाम सुफलाम योजने अंतर्गत लोकसहभागातून तालुक्यातील गिरोली शिवारातील श्री गुगुळा देवी संस्थान मंदिर परिसरातील माती नाला  बांध मधील गाळ काढून हा संपूर्ण परिसर पाणीदार करण्याचा संकल्प भारतीय जैन संघटना व  गुगुळा देवी संस्थेच्या वतीने करण्यात आला असुन याचा श्री गणेशा दि.३० मे रोजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांचे हस्ते करण्यात आला यावेळी इखर चे जिल्हा कार्यकारिणी सदस्य सन्मती जैन, महिला शाखेच्या अध्यक्षा सौ.रिता जिंतूरकर, गोविंद झोरे, वसंत अप्पा खुळे, दिपक बोरकर, मनिष कोठेकर, प्रा. मिनासे, उपस्थित होते,
     याबाबत सविस्तर असे की शहराच्या दक्षिणेकडे गिरोली शिवारात प्रसिद्ध असे पुरातन व डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत श्री गुगुळा देवी चे मंदिर असून लोकसहभागातून हा संपूर्ण परिसर यापूर्वीच हिरवेगार झाले असून निसगार्चा समतोल राखण्यासाठी व पाणी आडवा पाणी जिरवा याकरिता डोंगरावर पडणाºया पाऊसाचे पाणी वाहुन न जाता ठिकठिकाणी पाणी अडवण्यासाठी भारतीय जैन संघटना व गुगुळा माता संस्थेच्या संयुक्त विद्यमाने खोली करणाचे काम हाती घेण्यात आले आहे, लोकसहभागातून हा परिसर पाणीदार करून या ठिकाणी जनावरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, सोबतच या परिसरातील नैसर्गिक वातावरण कायम ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांचे लागवड करून  पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे,जल है तो कल है,प्रमाणे या कामाकरिता हजारो भाविकांनी मदतीचा हात पुढे केला आहे,भविष्यात हा परिसर जलमय होऊन पाणीदार होणार आहे,गाळ काढण्याचा शुभारंभ या विभागाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांचे हस्ते करण्यात आला यावेळी राजकुमार कछोट, जगदीश कापसे, प्रा.कल्याण चांडगे, कांता मुळे, गोविंद आहिरे, संदीप कटारे, निलंय जिंतूरकर, सतेज डोणगावकर, नंदन दयार्पूरकर, केतन भोरजे, उपस्थित होते,

     

 


No comments:

Post a Comment