जबाबदार वैद्यकीय अधिक्षक देण्याची गावकºयांची मागणी
देऊळगावमही : (प्रतिनिधी)
तालुक्यात नागपूर पूणे राष्ट्रीय महामार्गावर लागून असलेल्या ग्रामीण रूग्णालय देऊळगाव मही चा कारभार गत काहि दिवसापासून रामभरोसे चाललेला असून रूग्णालयाला कोन्ही वाली नसल्या बाबतची चर्चा सध्या परिसरात सुरू आहे. डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे रुग्णांच्या जीवावर उठली असून जबाबदार वैद्यकीय अधीकक्षकाची ग्रामस्थांना प्रतिक्षा आहे.
देऊळगावराजा तालुक्यातील सर्वा मोठी बाजार पेठ म्हणून देऊळगावमही ओळख आहे. नागपूर पूणे राष्ट्रीय महामार्गावर लागून ग्रामीण रुग्णालय आहे मात्र या रुग्णालयाचा काम रामभरोसे सुरु आहे. अनेकदा याची प्रचिती आलेली आहे. दरम्यान दि.११ जून रोजी रात्री साडेदहा वाजता विषारी औषध प्राशन करून ज्ञानेश्वर निलख नावाच्या रूग्णास उपचारासाठी रूग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते .परंतु रूग्णालयात एकही डॉक्टर कर्तव्यावर हजर नव्हते वैद्यकीय अधिक्षक डॉ.विशाल सोळंके यांना फोन केला असता तेहि नॉटरीचेबल लागत असल्यामुळे उपलब्ध होऊ शकले नाही रुग्णांची अवस्था गंभीर होत चाललेली होती.. गावातील नागरीकांनी कर्तव्यावर असलेल्या अधिपरीचारीका यांना डॉक्टर बद्दल विचार ना करण्यात आली परंतु अधिपरीचारीका यांनी सुद्धा वैद्यकीय अधिक्षक डॉ .सोळंके यांना फोन केला असता ते वेळेवर उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे रूग्णाला नातेवाईकांनी तक्काळ जालना येथे उपचारासाठी हलवले .. परंतु या सर्व प्रकारानंतर दवाखाण्यातील वैद्यकीय अधिक्षक डॉ सोळंके यांचा निष्काळजी पना चव्हाट्यावर आला आहे .. विशेष म्हणजे गावातील नागरीकांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ.सोळंके यांच्या बदली संदर्भात मागनी प्रशासनाकडे केली होती परंतु त्याची दखल घेतली गेली नाही आता तरी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रेमचंद पंडित व उपसंचालक डॉ.फारूकी या निष्काळजीपणा करणाºया वैद्यकीय अधिक्षकावर काय कार्यवाही करतात हे पाहन औत्सुक्याच ठरणार आहे ... तसेच रुग्णालयातील बºयाच कर्मचाºयाची या वैद्यकीय अधिक्षकाचे पटत नसल्यामुळे या रूग्णालयाचा कार्यभार सध्या रामभरोसे सुरू असून यावर काय कार्यवाही होते हे समोरील काळ ठरवेल. देऊळगावमही परिसरातील जवळपास ४० गावे जोडलेली आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी ग्रामीण रुग्णालय प्रशासनावर आहे. परंतु प्रशासनाकडून हलगर्जी करण्यात येत आहे.
यंत्रसामग्री धूळ खात..
ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध असलेले यांत्रिक उपकरणे नादुरुस्त असून धूळ खात आहेत. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय केवळ नावापुरते उरले आहे. आजूबाजूच्या गावातील रुग्णांना सुविधा उपलब्ध होत नाही. प़्रशासनाच्या हलगर्जीमुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.



No comments:
Post a Comment