एमआयएम,मुस्लीम सेवा संघ कार्यकर्ते धडकले तहसील कार्यालयात देऊळगाव राजा : प्रतिनिधी
झारखंड येथे तबरेज अन्सारी या युवकास जमावाकडून बेदम मारहाण करून जीवे मारून टाकल्याच्या राक्षसी कृत्याचा दि.२८ जून रोजी एमआयएम,मुस्लीम सेवा संघ वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवित तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देऊन देशात होणाऱ्या मोबलिंचींग घडविणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली दरम्यान मानते विरुद्ध घडणाऱ्या या घटना थांबवा अशी मागणीही करण्यात आली ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन, मुस्लीम सेवा संघ व वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती यांना निवेदन देऊन देशात अलीकडील काळात वाढत चाललेल्या मोबलीचींग या घटना तात्काळ थांबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की की भारत देश विविधतेने नटलेला या पृथ्वीतलावरील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश आहे अनेक धर्म पंथ असलेल्या या देशात सर्व धर्मातील नागरिकांना आपल्या धर्म संहितेनुसार जगण्याचा अधिकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने दिलेला आहे असे असताना अलीकडील काळात काही विशिष्ट विचार पंथाच्या जमावाकडून अल्पसंख्यांक युवकांना लक्ष करून बेदम मारहाण करीत ठार मारण्यात येत आहे झारखंड, बिहार,उत्तर प्रदेश,पश्चिम बंगाल या राज्यात घडणाऱ्या मोबलीचींग च्या घटना देशासाठी एक चिंतेचा विषय बनला आहे सदर कृत्य राक्षसी असून मानवतेच्या विरुद्ध आहे मोबलीचींग सारख्या घटना देशाच्या सार्वभौमत्वावर आघात असून प्रगतशील भारता साठी या घटना योग्य नाही सदर घटनांमुळे देशातील अखंडता एकता व बंधुता नष्ट होण्याची शक्यता असल्याने मोबलीचींग विरुद्ध राष्ट्रपती महोदयांनी तात्काळ कठोर कायदा करावा व अल्पसंख्यांक समाजाला संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे सदर निवेदन देताना एम आय एम चे जुनेद कुरेशी मुस्लीम सेवा संघाचे शेख कदीर वंचित बहुजन चे धर्मराज खिल्लारे यांच्यासह जहीर पठाण,बाळराजे देशमुख, शेख अतिक,अजमत खान,दत्ता जावळे,शाकीर लाला, रहीम खान,सय्यद मोबीन,हारून शहा, राहीब कोटकर,शेख तोहिद,परवेज खान,शेख जिलानी,सतीश जाधव,मुबारक शहा आदी युवकांची उपस्थिती होती


No comments:
Post a Comment