आ डॉ शशिकांत खेडेकर यांनी घेतली जलसंपदा राज्य मंत्र्यांची भेट
देऊळगाव राजा : प्रतिनिधी एकदा प्रकल्प जस जसा पूर्ण होत जातो तसे तसे ते शासकीय कार्यलय त्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करतात मात्र त्या प्रकल्पासाठी घरे दारे पाण्यात सोडणारे सर्वसामान्य माणूस मात्र उपेक्षित असतो हाच प्रकार खडकपूर्णा प्रकल्पग्रस्त बाबत घडत असताना दिसत असून जो पर्यंतप्रकल्प बाधित शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत प्रकल्पाचे कार्यलय हलविण्यात येऊ नये अशी मागणी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे केली आहे
परिसरातील शेतकऱ्यांना महत्वकांक्षी असणारा खडकपूर्णा प्रकल्प कार्यालय स्थलांतर करण्याच्या हालचाली प्रशासकीय स्तरावर सुरू झाले. खडक पूर्णा नदीवर उभारण्यात आलेले संत चोखा सागर खडकपूर्णा प्रकल्प हा बुलढाणा जिल्ह्यातील महत्वकांक्षी प्रकल्प असून देऊळगाव राजा सिंदखेड राजा चिखली व जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेतजमिनिवर हरित क्रांती चे स्वप्न घडविणारा प्रकल्प आहे सदर प्रकल्पात तालुक्यातील सात गावे पूर्णतः तर सात गावे अंशतः बाधीत झालेली आहे अद्यापही अनेक गावांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नसून प्रकल्पात पाणी अडवून पाच वर्षे उलटली तरी प्रकल्पग्रस्त गावांच्या समस्या आजही कायम आहे सदर प्रकल्प जलाशयाच्या सिंचन क्षेत्राचा कृती आराखडा यावेळी तयार करण्यात आला त्यावेळी खडकपूर्णा प्रकल्प कार्यालयाच्या दप्तरी हेक्टर सिंचन क्षेत्र दर्शविण्यात आले मात्र प्रत्यक्षात जलाशयाच्या बुडीत क्षेत्र लगत चे सिंचन जास्त असल्याने सदर वाढीव सिंचन क्षेत्राचे नव्याने सर्वेक्षण करून रेकॉर्डवर नोंद करण्यासाठी कार्यालयाची आवश्यकता आहे, सदर प्रकल्प अंतर्गत अंढेरा परिसरातील 13 गावांसाठी मंजूर करण्यात आलेल्या कालव्याचे काम अद्यापही सुरू करण्यात आले नाही, प्रकल्पबाधित गावांचे नवीन पुनर्वसित गावठाणातील विविध मूलभूत सुविधा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शेत जमिनी वहिवाटी साठी शेतरस्ते रखडले आहे मेहुणा राजा गावाचे पुनर्वसन थंडबस्त्यात आहे सदर प्रकल्प वीस वर्षांपूर्वी सुरू झाला त्यावेळी सुरुवातीच्या काळात निर्माण झालेले कालवे दुरुस्तीच्या उंबरठ्यावर आहे ही सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी खडकपूर्णा प्रकल्प कार्यालय देऊळगाव राजा तालुक्यात कायम कार्यरत राहणे अत्यंत आवश्यक आहे अशी मागणी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी केली आहे


No comments:
Post a Comment