Wednesday, July 3, 2019

आमदार विनायक मेटे यांच्या वाढदिवसा निमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप


देऊळगाव राजा : प्रतिनिधी
         देऊळगाव राजा शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांच्या वाढदिवसा निमित तालुक्यातील आंळद येथील जिल्हा परिषद शाळा मध्ये दि.१ जुलै रोजी सोमवारला संपूर्ण विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. 
       याप्रसंगी शिवसंग्रामचे तालुका संघटक जहीर खान पठाण यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, आ.मेटे यांच्या नेतृत्वात व जिल्हा अध्यक्ष संदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनात देऊळगांवराजा तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून शिवसंग्राम संघटना काम करत आहे.
विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांच्यासह सामाजिक विविध प्रश्न हताळून शासनाच्या निर्देशनास आणून ते सोडविन्याचे प्रामाणिक पणे कार्य करत असल्याचे सांगितले, यावेळी तालुका उपाध्यक्ष विनोदभाऊ खार्डे,तालुका संघटक जहीरखान पठाण, विष्णुदादा सानप, गजानन खार्डे, सुरेश निकाळजे, अयाजभाई पठाण, संतोष हिवाळे, अज़मत खान, माजी सैनिक गणपत खार्डे, मछिन्दर खार्डे, सुभाष नागरे, हरिदास नागरे, संदीप सपकाळ, यांच्यासह पालकवर्ग व शिक्षक बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विनोद खार्डे यांनी केले तर आभार  डोईफोड़े सर यांनी मानले.

No comments:

Post a Comment