अधिपरीचारीका सपकाळ यांना निरोप समारंभ सपन्न
देऊळगाव मही : (गजानन चोपडे)
आठवणींना जसा उजाळा मिळतो, तसे पुढील करिअरसाठी बेस्ट लक हे शब्द पाठबळ देऊन जातात. असे प्रतिपादन ग्रामीण रूग्णालयातील अधिपरीचारीका अनुराधा सपकाळ यांनी निरोप समारंभात केले नुकतीच त्यांची प्रशासकीय बदली स्त्री रूग्णालय बुलडाणा करण्यात आली. ग्रामीण रूग्णालयातील कर्मचा-यांच्या वतिने त्याचा हदय सत्कार करण्यात आला.
देऊळगाव मही ग्रामीण रूग्णालयातील अधिपरीचारीका अनुराधा सपकाळ यांनी त्यांच्या सहा वर्षाच्या काळात ग्रामीण रूग्णालय देऊळगाव मही येथे अत्यंत प्रामाणिक पणे आरोग्य सेवा देवून आपली जबाबदारी व्यवस्थित सांभाळली त्याच्या चांगल्या सभावाने रुग्णांमध्ये आपुलीकी निर्माण केली होती. सत्काराला उत्तर देतांना सपकाळ म्हणाल्या की, आठवणींना उजाळा देतात. आता प्रत्येक ठिकाणी निरोपाचे स्वरूप आता बदलत असले, तरी त्यामागील भावना सारख्याच असतात हे मात्र नक्की. ग्रामीण रूग्णालय माज्या कुटूंबाचा एक महत्वाचा भाग राहिलेला आहे येथील कर्मचा-यांनी माझा जो निरोप संमारंभ आयोजित केला त्या बद्दल मी कर्मचा-यांच्या आयुष्यभर ॠणाईत राहिल. यावेळी डॉ.प्रणब शेकार, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सानप साहेब, भगत साहेब, अधिपरीचारीका डाखोरे, स्वाती कदम, स्नेहल बेहरे, छाया निकाळजे, औषध निर्मान अधिकारी अर्चना सानप, समुपदेशक अंजली गोसावी, कनिष्ठ लिपिक किसन ताठे , एक्सरे टेक्नशीयन नागरे आदि कर्मचारी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment