देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
स्थानिक देऊळगाव राजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देऊळगाव राजाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य महादेव रामचंद्र थोरवे हे नियत वयोमानानुसार दि.३१ जुलै रोजी वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त झाले. शाळेतील कर्मचारिवृंद व विद्यार्थ्यांबरोबर निर्माण झालेला तब्बल ३२ वर्षांचा स्नेहबंध सोडून, कर्तव्यपूर्ती पूर्ण करून नौकरीतून निवृत्त होत आयुष्यातील पुढच्या टप्प्यात पदार्पण करीत आहे याप्रसंगी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
सन १९८७ साली ते या शिक्षण संस्थेमध्ये कनिष्ठ प्राध्यापक या पदावर रुजू होत रसायनशास्त्र विषय शिकवण्यास सुरुवात केली अल्पावधीतच ते विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांनी घोषित केले. त्यांचे विद्यार्थी आज विविध उच्च पदावर कार्यरत असून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतात. त्यांच्या वाट्याला आलेल्या या भावपूर्ण अनुभवामुळे ते भारावून गेले होते. त्यांना निरोप देताना विद्यार्थ्यांचसह कर्मचाºयांनाही आसवं आवरता आली नाही. भावनिकतेने वातावरण भारावलं होतं. असा भावनांनी ओथंबलेला आगळा वेगळा निरोप समारंभ आज शाळेतील मुलांसह कर्मचारी वृंदानी अनुभवला. हे सारं पाहणाºयाच्याही डोळ्याच्या कडा केव्हा ओलावल्या त्यांनाही समजलं नाही. रसायन शास्त्र विषयावरील सहज प्रभुत्व, विषय शिकवितांना शिक्षकाचं काम बोललं पाहीजे या तळमळीतून केलेल्या कामामुळे विद्यार्थी भलतेच खुश होते. विविध प्रयोग, उपकरणे, संदर्भ देत, विद्याथ्यार्शी संवाद साधण्याच्या कौशल्यामुळे ते भलतेच विद्यार्थीप्रिय झाले होते. त्याशिवाय शाळेतील प्रत्येक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग, वक्तृत्व व ओघवत्या शैलीत केलेले मार्गदर्शन यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढत असे. परिपूर्ण शिक्षक असलेल्या या शिक्षकाच्या निरोप समारंभ प्रसंगी सर्व कर्मचारी वृदानी सत्कार केला यावेळी नवनियुक्त मुख्याध्यापक डी बी राजपूत, पर्यवेक्षक आर बी कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केले .सूत्रसंचालन गणेश मुंडे यांनी केले. यावेळी पि के राठोड, एस एल बोरकर, एस यु मोरे, ए जी खोद्रे, व्ही एन खलसे , नीलकंठ आव्हाले, निलेश सदावर्ते, रामदास गुरवसह कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment