Wednesday, July 31, 2019

शासनाच्या निर्णयाचे धनगर समाजाकडून स्वागत


 देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाने धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या २२ योजना लागू कनण्याच्या निणयार्ला मान्यता दिली आहे. यामुळे एसटी प्रवगार्ला असलेल्या सर्व सवलती धनगर समाजाला लागू होणार आहेत. मंत्रीमंडळाच्या या निर्णयाचे धनगर समाज बांधव व राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख सुनील मतकर स्वागत केले आहे.
         धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या सवलती द्याव्यात, या मागणीसाठी समाजबांधवांनी शासनाकडे अनेकवेळा मागणी केली होती. यासाठी धरणे, मोर्चे, निदर्शने, रास्ता रोको, मुंडण यासह विविध आंदोलने करण्यात आली होती. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण जाहीर करण्याचे आश्वासन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. तसेच धनगर समाजाने बारामतीमध्ये मोर्चा काढला तेव्हा 'आम्ही सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच मीटिंगमध्ये आरक्षणाचा प्रश्न निकाली काढू' असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. परंतु त्यानंतर त्यांनी आपला शब्द न पाळल्याने राज्यातील धनगर समाजबांधव आक्रमक झाले होते. दरम्यान राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. महादेव जानकर यांनी या मागणीसाठी राज्य शासनावर दबाव वाढविला होता. अखेर अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या सवलती धनगर समाजाला लागू करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे धनगर समाजबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. समाजासाठी हा मोठा निर्णय असून समाजाच्या लढ्याला यश मिळाले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख सुनील मतकर यांनी दिली आहे.  




 

 
     

No comments:

Post a Comment